7 July 2024 11:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार हा PSU शेअर, कंपनी ऑर्डर बुकचा 27,208 कोटी रुपयांवर Bigbloc Share Price | संधी सोडू नका! फ्री बोनस शेअर्स मिळतील, शॉर्ट टर्म मध्ये वाढेल पैसा NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, शॉर्ट टर्म मध्ये होईल मोठी कमाई Inox Wind Share Price | कर्जमुक्त कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, पुढेही मल्टिबॅगर परतावा मिळण्याचे संकेत Suzlon Share Price | आता थांबणार नाही सुझलॉन शेअर! 5 तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार Smart Investment | तुम्ही महिना 3000 रुपये बचत करा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा, स्मार्ट गुंतवणूक समजून घ्या Bajaj Freedom 125 | बजाज फ्रीडम 125 CNG ने 1 रुपयात 1 KM प्रवास, खरेदीपूर्वी बाईकचे 5 फीचर्स नोट करा
x

RVNL Share Price | हा PSU शेअर बुलेट ट्रेन तेजीने धावणार, नेमकं कारण काय? यापूर्वी दिला 2000% परतावा

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 421 रुपये किमतीवर पोहोचले होते. तर आज देखील हा स्टॉक तुफान तेजीत धावत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच एक मोठे कंत्राट मिळाले आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत आरव्हीएनएल कंपनीला विद्युत प्रणाली अपग्रेड करण्याचे काम देण्यात आले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे मूल्य 132.59 कोटी रुपये आहे. या कामाची पूर्तता करण्यासाठी कंपनीला 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.08 टक्के वाढीसह 421.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच आरव्हीएनएल कंपनीने दुबईमध्ये एका उपकंपनीची स्थापन केली आहे. मागील काही वर्षात आरव्हीएनएल स्टॉक 19 रुपयेवरून वाढून 421 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2000 टक्के परतावा कमावून दिला आहे. 31 जुलै 2020 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 19.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 421 रुपये किमतीवर पोहचला होता.

जर तुम्ही 31 जुलै 2020 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 21.89 लाख रुपये झाले असते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 243 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 121.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 421 रुपये किमतीवर पोहचला आहे.

मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 185.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 60 टक्के वाढवले आहे. आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 432 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 117.35 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 04 July 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x