23 December 2024 11:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

RVNL Share Price | RVNL स्टॉक टेक्निकल चार्टवर ओव्हरबॉट झोनमध्ये, स्टॉक 'BUY' करावा की 'Hold'?

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स सोमवारी 11.3 टक्के वाढीसह 400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीचे शेअर कोसळले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 424.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 85,000 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 13.77 टक्के घसरणीसह 348.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

मागील 12 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. आरव्हीएनएल स्टॉक टेक्निकल चार्टवर ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत आहे. या स्टॉकचा RSI 81.5 अंकावर ट्रेड करत आहे. मार्च 2024 तिमाहीमध्ये आरव्हीएनएल कंपनीने जबरदस्त कामगिरी केली होती. मार्च तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीचा महसूल, EBITDA, PAT अनुक्रमे 17 टक्के, 22 टक्के, आणि 33 टक्के नोंदवला गेला होता.

मार्च 2024 तिमाहीमध्ये आरव्हीएनएल कंपनीच्या ऑर्डरबुकचा आकार 85,000 कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये आरव्हीएनएल कंपनीचा ऑर्डर प्रवाह 20,000 ते 25,000 कोटींच्या श्रेणीत राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी जुलै 2023 मध्ये भारत सरकारने आरव्हीएनएल कंपनीतील आपला 5.4 टक्के वाटा 119 रुपये किमतीवर विकला होता. डिसेंबर 2023 मधील शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार भारत सरकारकडे आरव्हीएनएल कंपनीचे 72.84 टक्के भाग भांडवल आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 04 June 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(158)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x