21 April 2025 1:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

RVNL Share Price | RVNL शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, 1 वर्षात 250% परतावा देणारा शेअर खरेदी करावा?

RVNL Share Price

RVNL Share Price | मागील काही दिवसापासून आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. काही दिवस या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत विक्रीचा दबाव निर्माण झाला, आणि अक्षरशः गुंतवणूकदारांमध्ये खळबळ माजली होती. मात्र पुन्हा हा स्टॉक तेजीत आला आहे. अजूनही शेअरमधील अस्थिरता संपली नाहीये.

आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11.55 टक्के वाढीसह 256.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज पुन्हा हा स्टॉक थोडा घसरला आहे. आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.28 टक्के घसरणीसह 245 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सध्या आरव्हीएनएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 51,354 कोटी रुपयेवर पोहचले आहे.

नुकताच आरव्हीएनएल कंपनीला मध्य प्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत 1 वितरक कंपनीने 106.37 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सचा एक वर्षाचा बीटा 1.4 आहे, जो उच्च अस्थिरतेचे संकेत देत आहे. आरव्हीएनएल स्टॉक रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सवर 40.4 अंकावर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाहीये.

रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवसांच्या खालील सरासरी किंमत पातळीच्या खाली मात्र 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मुविंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 95 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 250 टक्के वाढवले आहे.

YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 35 टक्के वाढली आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉक 248-250 रुपये किमतीवर खरेदी करण्यास आकर्षक वाटत आहे. हा स्टॉक पुढील काही दिवसात 265 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मात्र गुंतवणूकदारांनी पैसे लावताना 240 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावावा.

आरव्हीएनएल ही कंपनी भारतीय रेल्वेची एक कार्यकारी शाखा आहे जी एक SPV म्हणून स्थापन करण्यात आली होती. ही कंपनी मुख्यतः नवीन रेल्वे लाईन बांधणे, त्यांचे दुहेरीकरण, रेल्वे गेजचे रूपांतरण, रेल्वे विद्युतीकरण, मेट्रो प्रकल्प, रेल्वे दुरुस्ती कार्यशाळा, मोठे पूल, केबल स्टेड ब्रिज यासह सर्व प्रकारच्या रेल्वे पायाभूत सुविधा संबंधित कामकाज करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 14 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या