23 December 2024 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

RVNL Share Price | PSU शेअर बुलेट ट्रेन तेजीने परतावा देणार, 1 महिन्यात दिला 41% परतावा, आली फायद्याची अपडेट

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल या सार्वजनिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीला 160.08 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. आरव्हीएनएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना ईस्ट कोस्ट रेल्वेकडून ही ऑर्डर मिळाली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.09 टक्क्यांच्या घसरणीसह 390 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 81,315 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 2.43 टक्के वाढीसह 399.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आरव्हीएनएल कंपनीला नवीन ऑर्डर अंतर्गत ड्युअल मल्टी-सेक्शन डिजिटल एक्सल काउंटरसह स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग सिस्टमचे काम देण्यात आले आहे. यासह कंपनीला विद्यमान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, पॅनेल इंटरलॉकिंग, आणि रूट रिले इंटरलॉकिंग स्टेशनचे काम देण्यात आले आहे. आरव्हीएनएल कंपनीने ड्युअल MSDAC सह स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग सिस्टीम आणि विद्यमान EI/PI/RRI स्टेशन्सचे रूपांतरण करण्याच्या कामांसाठी सर्वात कमी बोली लावली होती.

आरव्हीएनएल कंपनीला नवीन प्रकल्पांतर्गत ईस्ट कोस्ट रेल्वेच्या खुर्द रोड विभागातील जाखापुरा-गुडी, खुर्दा रोड आणि भुसुंदपूर-गोलंथरा या ठिकाणावर काम करायचे आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला 24 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. मार्च 2024 तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने 33.2 टक्के वाढीसह 478.6 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने 359 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मार्च 2014 तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीचा महसूल 17.4 टक्क्यांच्या वाढीसह 6,714 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाही कालावधीत कंपनीने 5,719.8 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत कंपनीचा EBITDA 21.8 टक्क्यांनी वाढून 456.4 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत कंपनीचा EBITDA 374.6 कोटी रुपये होता.

मागील एका महिन्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 41 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 113 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 217 टक्के वाढली आहे. मागील 4 वर्षात आरव्हीएनएल स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2025 टक्के वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 18 June 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(158)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x