22 November 2024 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

RVNL Share Price | 1301 टक्के परतावा देणाऱ्या RVNL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, मोठी फायद्याची अपडेट आली

RVNL Share Price|

RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पुढील काळात या कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते. कारण या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार आता 65,000 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 254.30 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 281.30 रुपये किमतीवर पोहोचला होता. मात्र नंतर किंचित नफा वसुली झाल्याने शेअर पुन्हा खाली आला. आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.54 टक्के घसरणीसह 264.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आरव्हीएनएल कंपनी आता पश्चिम आशियासह मध्य आशिया आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या परकीय बाजारपेठांमध्ये व्यवसायाच्या नवीन संधी शोधत आहे. पुढील काळात या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 75000 कोटी रुपये होईल.

मागील 5 दिवसात रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. या काळात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 121 टक्के वाढली आहे.

आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 345.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 56.05 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 317 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1301 टक्के नफा कमावून दिला आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीच्या निव्वळ नफा आणि महसूल संकलनात किंचित घट नोंदवली गेली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 382 कोटी रुपयेवरून 6 टक्के कमी होऊन 359 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

सप्टेंबर 2023 तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा निव्वळ नफा 394 कोटी रुपयेवरून 8.8 टक्के घसरला आहे. डिसेंबर तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने 4689 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 5,012 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. वार्षिक आधारावर या कंपनीच्या शेअर्समध्ये 6.44 टक्के घसरण झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 20 February 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x