18 October 2024 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, मिळेल 104% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: DEEPAKNTR BMC Recruitment 2024 | मुंबई महानगरपालिकेत 690 रिक्त जागांसाठी भरती, पगार 1,42,000 रुपये, असा करा अर्ज - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका - NSE: RVNL
x

RVNL Share Price | PSU स्टॉकबाबत फायद्याची अपडेट, पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार? यापूर्वी दिला 1150% परतावा

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स सोमवारी 6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 399.70 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून एक कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत आरव्हीएनएल कंपनी नागपूरमध्ये 6 एलिव्हेटेड मेट्रो स्टेशन्स बांधणार आहे. या प्रकल्पात आरव्हीएनएल कंपनीला 6 उन्नत मेट्रो स्थानके बांधायची जबाबदारी देण्यात आली आहे. आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.64 टक्के घसरणीसह 370.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आरव्हीएनएल कंपनी जे सहा मेट्रो स्टेशन उभारणार आहे, त्यामध्ये नागपूरमधील कॅन्टोन्मेंट, केम्प्टी पोलिस स्टेशन, केम्प्टी नगर परिषद, ड्रॅगन पॅलेस, गोल्फ क्लब आणि कन्हान रिव्हर मेट्रो स्टेशन यांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे एकूण मूल्य 187.34 कोटी रुपये आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आरव्हीएनएल कंपनीला 30 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

मागील 2 वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1150 टक्के वाढले आहेत. 27 मे 2022 रोजी रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 31.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 27 मे 2024 रोजी या रेल्वे कंपनीचे शेअर्स 399.70 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील एका वर्षात रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 220 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 121.55 रुपयेवरून वाढून 400 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 166.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 399.70 रुपये किंमतीवरून खाली आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 28 May 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(124)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x