15 January 2025 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

RVNL Share Price | RVNL स्टॉकने मजबूत ब्रेकआऊट दिला, जोरदार खरेदी सुरू, पुढे फायदाच फायदा

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या शेअर्सने 600 रुपये किंमत पार केली आहे. YTD आधारावर या कंपनीचे शेअर्स 233.76 टक्के वाढले आहेत. या कंपनीचे शेअर्स 647 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 6.04 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहेत. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला 191.53 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

या कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वेकडून राजखासवान-नयागर रेल्वे ट्रॅकवरील 2x25KV सिस्टीमची लोडिंग क्षमता 3000MT वर नेण्याचे, आणि 132 KV ट्रॅक्शन सबस्टेशन, सेक्शनिंग पोस्ट, आणि 2x25KV सिस्टीममधील सब सेक्शनिंग पोस्टचे डिझाईन, पुरवठा, उभारणी, चाचणी आणि चालू करण्याचे काम मिळाले आहे. त्यामुळे हा सरकारी रेल्वे स्टॉक तेजीत आला आहे. आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.58 टक्के वाढीसह 615.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टेक्निकल चार्टवर आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने 570 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तसेच या स्टॉकला 607-610 रुपये दरम्यान जोरदार प्रतिकार मिळत होता. आता या स्टॉकने 610 रुपये किमतीवर मजबूत ब्रेकआऊट दिला आहे. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांनी आरव्हीएनएल स्टॉकमध्ये 550 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 644 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉक पुढील काही दिवसात 630 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र तज्ञांनी लोकांना 570 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉकने 550 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तसेच या स्टॉकला 610 रुपये किमतीवर प्रतिकार मिळत आहे. या स्टॉकची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 545 ते 612 रुपयेच्या दरम्यान असेल.

आरव्हीएनएल ही कंपनी भारतीय रेल्वेची SPV म्हणून व्यवसाय करते. ही कंपनी रेल्वे मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी टर्नकी आधारावर संकल्पना तयार करण्यापासून ते कार्यान्वित करण्यापर्यंत सर्व प्रकल्पाच्या विकासाचे काम करण्यात एक्स्पर्ट मानली जाते. कंपनी आपल्या ग्राहकांना डिझाइन, बजेट अंदाज, कॉलिंग आणि कॉन्ट्रॅक्ट्स, प्रोजेक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट या सर्व प्रकारच्या सेवा प्रदान करते. जून 2024 पर्यंत भारत सरकारने या कंपनीचे 72.84 टक्के भागभांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 30 July 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(162)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x