23 February 2025 3:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office FD Vs RD | पोस्ट ऑफिस FD की RD, 5 लाखांच्या ठेवीवर जास्त फायदा कुठे मिळेल येथे जाणून घ्या Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार
x

RVNL Share Price | संधी सोडू नका! RVNL शेअर 1000 रुपयांच्या लेव्हलला स्पर्श करणार, अपडेट नोट करा

RVNL Share Price

RVNL Share Price | मागील काही दिवसापासून आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये (NSE: RVNL) सातत्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.10 टक्क्यांच्या वाढीसह 603.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 370 टक्के नफा कमावून दिला आहे. आरव्हीएनएल स्टॉक सध्या आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA च्या वर ट्रेड करत आहेत. आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.11 टक्के वाढीसह 601.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच आरव्हीएनएल कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगद्वारे माहिती दिली आहे की, त्यांना खरगपूर रेल्वे विभागातील खरगपूर-भद्रक विभागावर 2×25 KV प्रणालीमध्ये 132 KV ट्रॅक्शन सबस्टेशन, सेक्शनिंग पोस्ट आणि सब सेक्शनिंग पोस्टचे डिझाईन, पुरवठा, बांधकाम संबंधित कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. दक्षिण पूर्व रेल्वेकडून देखील कंपनीला बांधकाम, चाचणी आणि कार्यान्वित करण्यासाठी मंजुरी पत्र प्रदान करण्यात आले आहे.

या ऑर्डरचे एकूण मूल्य 202.87 कोटी रुपये असून काम करण्यासाठी कंपनीला 18 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. नुकताच RVNL कंपनीने पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीसह एक सामंजस्य करार केला आहे. यामध्ये दोन्ही कंपन्या जलविद्युत आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित क्षेत्रांमध्ये समन्वय साधण्यासाठी सहकार्य करणार आहेत.

तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल कंपनीची कमाई आणि ऑर्डर बुक मजबूत आहे. त्यामुळे तज्ञांनी हा स्टॉक पुढील 3 ते 5 वर्षांच्या मुदतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील 3-4 वर्षात या कंपनीचे शेअर्स 1000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मागील 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सची किंमत 148 टक्के आणि एका वर्षात 370 टक्के वाढली आहे. या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 647 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 129.90 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,26,498.17 कोटी रुपये आहे.

News Title | RVNL Share Price NSE: RVNL 03 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x