16 January 2025 4:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

RVNL Share Price | RVNL सहित हे 6 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा

RVNL Share Price

RVNL Share Price | मागील काही दिवसांपासून रेल्वे स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुंतवणुकदारांना मजबूत परतावा (NSE: RVNL) कमावून देणाऱ्या रेल्वे स्टॉकमध्ये रेल विकास निगम, इरकॉन इंटरनॅशनल, RITES, RailTel Corporation of India आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन यासारख्या रेल्वे कंपन्याचे शेअर्स सामील आहेत. (NSE:RVNL)

मागील 18-24 महिन्यांच्या कालावधीत या कंपन्यांचे शेअर्स 2,100 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे तज्ञांनी या कंपन्यांच्या शेअर्सबाबत सकारात्मक व्यक्त करून गुंतवणूक करून करण्याचा सल्ला दिला आहे. आज या लेखात आपण काही रेल्वे स्टॉकबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

RITES :
मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 826.15 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. मंगळवारी या कंपनीचे शेअर 20 टक्क्यांनी घसरून 666 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. Axis Securities फर्मने या स्टॉकवर 660 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तर एलारा कॅपिटल फर्मने या स्टॉकची टारगेट प्राइस 750 रुपयेवरून वाढवून 815 रुपये केली आहे. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के घसरणीसह 658 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

IRCTC :
मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. 22 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,148.30 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर 822 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के वाढीसह 938.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

RailTel :
मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 580 टक्के परतावा दिला आहे. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के वाढीसह 470.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 618 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील एका महिन्यात या शेअरच्या किमतीत 25 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने या स्टॉकवर 315 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

इरकॉन इंटरनॅशनल :
मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 775 टक्के परतावा दिला आहे. 15 जुलै रोजी हा स्टॉक 350 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आयडीबीआय कॅपिटल फर्मने या स्टॉकवर 272 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.55 टक्के वाढीसह 266.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रेल विकास निगम :
मागील दोन वर्षांत या स्टॉकने लोकांना 2,100 टक्के परतावा दिला आहे. जुलै 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 647 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात हा स्टॉक 13 टक्क्यांनी घसरला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग देऊन नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 283 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.06 टक्के वाढीसह 569.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टिटागड रेल :
मॉर्गन स्टॅन्ले फर्मने या स्टॉकला ‘ओव्हरवेट’ रेटिंग जाहीर केली आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या मते हा स्टॉक पुढील काळात 1,337 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.45 टक्के घसरणीसह 245.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2025 पर्यंत 90,000 वॅगन खरेदी करण्याच्या भारतीय रेल्वेच्या योजनेचा फायदा या कंपनीला होणार आहे. उत्पादन क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांमुळे या संधींचा फायदा कंपनीला होईल, असे मॉर्गन स्टॅन्लेनी म्हंटले आहे.

News Title | RVNL Share Price NSE: RVNL 22 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(162)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x