21 January 2025 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीबाबत अपडेट, 40 रुपयाचा शेअर मालामाल करणार- NSE: RPOWER Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स
x

RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर 'BUY' करावा की Sell? तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, काय आहे अपडेट?

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकिंगने आरव्हीएनएल कंपनीचा (NSE: RVNL) मल्टीबॅगर स्टॉक विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्क्यांपेक्षा जास्त (NSE:RVNL) नफा कमावून दिला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

सध्या तज्ञांनी गुंतवणुकदारांना आरव्हीएनएल स्टॉकपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्याच्या किंमतीपेक्षा 50 टक्के खाली येऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.087 टक्के घसरणीसह 576.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अँटीक ब्रोकिंग फर्मने आरव्हीएनएल स्टॉकवर SELL रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 283 रुपये किमतीवर येऊ शकतो. 23 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 573 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. म्हणजेच तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 50 टक्के स्वस्त होऊ शकतो. आरव्हीएनएल कंपनीने अनेक सामंजस्य करार आणि जेव्हीमध्ये प्रवेश केल्यामुळे कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

आरव्हीएनएल कंपनीचा सहभाग असलेल्या किर्गिझस्तान प्रकल्पाचे एकूण मुल्य 20,000 कोटी रुपये आहे. तसेच वंदे भारत प्रकल्पामध्ये आरव्हीएनएल कंपनीने मोठे योगदान दिले आहे. यामध्ये कंपनीने 2500 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. तज्ञांच्या मते, सध्या आरव्हीएनएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 85,000 कोटी रुपये आहे. यामध्ये वंदे भारत संबंधित ऑर्डर्सचा समावेश नाही. वंदे भारत ऑर्डरमध्ये आरव्हीएनएल कंपनीची गुंतवणूक 8000 कोटी रुपये आहे.

मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 215 टक्क्यांनी वाढले होते. मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल स्टॉक 115 टक्के मजबूत झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 647 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 122.90 रुपये होती. आरव्हीएनएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.20 लाख कोटी रुपये आहे.

News Title | RVNL Share Price NSE: RVNL 27 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(164)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x