23 December 2024 9:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

RVNL Share Price | RVNL शेअर तेजीत वाढतोय, शेअर्सच्या तेजीचे कारण काय? गुंतवणूक करून मल्टिबॅगर फायदा घेणार का?

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 100 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे, रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने महाराष्ट्र मेट्रोच्या 6 स्थानकांचे काम मिळवण्याच्या टेंडरमध्ये सर्वात कमी बोली लावली आहे. यामुळे त्यांना हे टेंडर मिळण्याची शक्यता अधिक वाढली आहे. शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.65 टक्के वाढीसह 138.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

स्टॉक वाढीचे कारण

30 ऑगस्ट 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने सेबी कळवले की, कंपनीने महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पातील टेंडरसाठी सर्वात कमी बोली लावली होती. जी कंपनी हे टेंडर जिंकेल त्यांना या प्रकल्पा अंतर्गत पिवळी नदी आणि लेखा नगर दरम्यान 6 उन्नत मेट्रो स्थानके उभारणीचे काम मिळणार आहे. या प्रकल्पाचे मूल्य 256 कोटी रुपये आहे. एखाद्या टेंडरवर सर्वात कमी बोली लावणे, म्हणजे ती कंपनी हा प्रकल्प इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वात कमी खर्चात पूर्ण करण्यास सक्षम आहे.

रेल विकास निगम कंपनीच्या शेअर धारकांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे, कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहे. यासाठी कंपनीने 20 सप्टेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीची एजीएम 27 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 2.45 टक्के वाढीसह 132.80 रुपये या इंट्रा-डे उच्चांकावर ट्रेड करत होते.

मागील एका वर्षभरात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. रेल विकास निगम कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 146.65 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 32.60 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price today on 02 September 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(158)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x