22 November 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

RVNL Share Price Today | सरकारी कंपनीचा शेअर, मागील एका महिन्यात 72 टक्के परतावा, खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड

RVNL Share Price

RVNL Share Price Today | ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘आरव्हीएनएल’ कंपनीच्या शेअरने 130 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 118.40 रुपये या किमतीवर ओपन झाले होते. मागील तीन ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 26 टक्के मजबूत झाले आहेत.

मागील एका महिन्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 72.66 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 89.79 टक्के परतावा कमावून दिला आहे. RVNL कंपनीचे शेअर्स मागील.एका वर्षात 294.24 टक्के मजबूत झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 128.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तेजीचे कारण :
आरव्हीएनएल कंपनीला अनेक नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे आणि कंपनीला ‘नवरत्न’ दर्जा मिळाल्यामुले शेअर्समध्ये ही वाढ पाहायला मिळत आहे. या कंपनीला एकापाठोपाठ एक मोठ्या ऑर्डर्स मिळत असून कंपनीची कामगिरी आणि शेअरची किंमत तेजीत वाढत आहे. बजाज सागर प्रकल्प, बांसवाडा राजस्थान अभियांत्रिकी-खरेदी आणि बांधकाम, सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी टर्नकी आधारावर, 10 वर्षांच्या O&M सह आरव्हीएनएल कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळेल आहेत.

या प्रकल्पाचे मूल्य 2,249 कोटी रुपये असून आरव्हीएनएल चा त्यात हिस्सा 51 टक्के.आणि SCC चा हिस्सा 49 टक्के आहे. RVNL कंपनीने चेन्नई मेट्रो रेल्वे फेज- I प्रकल्पाच्या एकूण 3,146 कोटी रुपयांच्या तीन भूमिगत पॅकेजचे कंत्राटवर ही मोठी बोली लावून ताबा मिळवला आहे. अलीकडील कॉर्पोरेट फाइलिंगमध्ये सार्वजनिक उपक्रम विभागाने आरव्हीएनएल कंपनीला नवरत्न असा दर्जा दिला आहे.

शेअरची लक्ष्य किंमत :
ट्रेंडलाइन डेटानुसार आरव्हीएनएल कंपनीच्या स्टॉकची लक्ष्य किंमत 186 रुपये आहे. रेल्वे विकास निगम कंपनीच्या स्टॉकवर दोन तज्ञांनी खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तांत्रिकदृष्ट्या RVNL कंपनीचे शेअर्स 8 SMA पैकी 8 वर ट्रेड करत आहेत. पुढील काळात हा स्टॉक गुंतवणुकदारांना आणखी परतावा कमावून देऊ शकतो, असे तज्ञांना वाटते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price today on 04 May 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x