15 November 2024 3:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL
x

RVNL Share Price | होय! लिस्ट सेव्ह करा, RVNL सहित हे शेअर्स अल्पावधीत मालामाल करत आहेत, खरेदीचा श्री-गणेशा करा

RVNL Share Price

RVNL Share Price | मागील दोन दिवसापासून भारतीय शेअर बाजाराची स्थिती खूप नाजूक असल्याची पाहायला मिळत आहे. आता आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आणि कॅनडाच्या संबंधात मिठाचा खडा पडला आहे. याचा देखील नकारात्मक परिणाम भारतातील गुंतवणुकीवर होण्याची शक्यता आहे. मात्र सर्वच शेअर नकारात्मक कामगिरी करतात असे नाही. काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.

शेअर बाजारातील तज्ञांनी असे काही 38 शेअर्स निवडले आहेत, ज्यानी मागील वर्षीच्या गणेश चतुर्थीपासून या वर्षीपर्यंत गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. चला तर मग मागील वर्षीच्या गणेश चतुर्थीपासून या वर्षीच्या गणेश चतुर्थीपर्यंत सर्वोत्तम परतावा देणाऱ्या स्टॉक बाबत जाणून घेऊ.

Mazagon Dock Shipbuilders

मागील वर्षी 30 ऑगस्ट 2022 रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी या कंपनीचे शेअर्स 391.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सध्या चालू आठवड्यात सोमवारी या कंपनीचे शेअर्स 2,198.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशाप्रकारे मागील वर्षीच्या गणेश चतुर्थी पासून ते आताच्या गणेश चतर्थीपर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 479 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के घसरणीसह 2,239.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रेल विकास निगम लिमिटेड

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 418 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील वर्षीच्या गणेश चतुर्थीपासून ते यावर्षीच्या गणेश चतुर्थीपर्यंत या RVNL कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 418 टक्के पेक्षा जास्त वाढवले आहेत. आज गुरूवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.061 टक्के घसरणीसह 163.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भरघोस परतावा देणाऱ्या स्टॉकमध्ये

मागील वर्षीच्या गणेश चतुर्थीपासून ते यावर्षीच्या गणेश चतुर्थीपर्यंत गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देणाऱ्या स्टॉकमध्ये लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी, अपार इंडस्ट्रीज, जिंदाल स्टेनलेस, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, JBM ऑटो, इरकॉन इंटरनॅशनल, UCO बँक आणि सुझलॉन एनर्जी यासारखे शेअर्स देखील सामील आहेत. या शेअर्सनी अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 200-300 टक्के परतावा कमावून दिला आहे.

असे इतर शेअर्स देखील आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना 100-190 टक्के परतावा कमावून दिला आहे. PSU क्षेत्रातील शेअर्सनी मागील एका वर्षात मजबूत कामगिरी केली आहे. गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळवून देणाऱ्या 38 शेअर्समध्ये 21 शेअर्स सरकारी मालकीचे आहेत. या यादीत माझगॉन डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स टॉपवर आहेत. त्यानंतर RVNL आणि Lode Metals and Energy ya कंपनीच्या शेअरने जबरदस्त कामगिरी केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price today on 21 September 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x