12 January 2025 4:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

RVNL Vs IRFC Share Price | रेल्वे संबंधित शेअर्सचा धुमाकूळ, अल्पावधीत मिळतोय मल्टिबॅगर परतावा, वेळीच फायदा घ्या

RVNL Vs IRFC Share Price

RVNL Vs IRFC Share Price | रेल विकास निगम म्हणजेच आरवीएनएल कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला मध्य रेल्वे विभागाकडून बोगदे आणि पूल बांधण्यासाठी 311 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली आहे.

शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 158.75 रुपये किमतीवर ओपन झाले होते, मते काही वेळात हा स्टॉक 168.75 रुपये किमतीवर पोहोचला होता. शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी आरवीएनएल स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 166.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

आरवीएनएल कंपनीच्या शेअरने मागील चार वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी चार वर्षापूर्वी आरवीएनएल स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 9 लाख झाले आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून आरवीएनएल स्टॉक पुन्हा तेजीत आला आहे.

मागील एका वर्षात आरवीएनएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 175 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील चार वर्षांत आरवीएनएल कंपनीच्या शेअरची किंमत 19.75 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर आली आहे. या काळात आरवीएनएल कंपनीच्या शेअर धारकांनी 752 टक्के नफा कमावला आहे.

आरवीएनएल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 56.06 रुपये होती. तर उच्चांक पातळी किंमत 199.25 रुपये होती. RVNL म्हणजेच रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला मध्य रेल्वेकडून प्राप्त झालेल्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत 4 बोगद्यांचे बांधकाम, बॅलेस्टलेस ट्रॅक, बांधकामातील मातीकाम, पूल, मोठे पूल, लहान पूल असे सर्व काम करायचे आहे. यासह आरवीएनएल कंपनीला दगडी गिट्टीचा पुरवठा, ट्रॅकचे बांधकाम, ट्रॅक लिंकिंग, साइड ड्रेन रिटेनिंग वॉल यासंबंधित कामे देखील करायची आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Vs IRFC Share Price NSE 18 November 2023.

हॅशटॅग्स

RVNL Vs IRFC Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x