18 November 2024 4:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Sakuma Share Price | शेअरची किंमत 25 रुपये! कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, वेळीच खरेदी करा

Sakuma Share Price

Sakuma Share Price | सकुमा एक्सपोर्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कोरोना काळात मार्च 2020 मध्ये सकुमा एक्सपोर्ट कंपनीचे शेअर्स 3.35 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक 27 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील चार वर्षांत सकुमा एक्सपोर्ट या स्मॉलकॅप कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 650 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 17 रुपयेवरून वाढून 25.35 रुपये किमतीवर पोहचली आहे. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी सकुमा एक्सपोर्ट कंपनीचे शेअर्स 5.82 टक्के घसरणीसह 25.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका वर्षात सकुमा एक्सपोर्ट कंपनीच्या शेअर्सची किंमत 13.75 रुपये किमतीवरून वाढून 25.35 रुपये किमतीवर पोहचली आहे. या काळात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 85 टक्के परतावा कमावला आहे. नुकताच सकुमा एक्सपोर्ट कंपनीने मका खरेदी-विक्री व्यवसायात उतरण्याची घोषणा केली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार पुढील हंगामासाठी कंपनीला 500 कोटी रुपयेची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. सध्या कंपनीचा वार्षिक महसूल 11.19 टक्के वाढीसह 3180 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कंपनीने चालु आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत आपल्या महसुल संकलनात 9.59 टक्के वाढ नोंदवली असून 364.33 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 167.06 अंकांच्या वाढीसह म्हणजेच 0.23 टक्क्यांनी वाढून 71,595.49 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 64.55 अंकांच्या वाढीसह म्हणजेच 0.30 टक्क्यांनी वाढून 21,782.50 अंकांवर क्लोज झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sakuma Share Price NSE Live 10 February 2024.

हॅशटॅग्स

Sakuma Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x