18 November 2024 10:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Salary Account Facility | हलक्यात घेऊ नका भाऊ, तुमच्या सॅलरी अकाउंटवर अनेक आर्थिक फायदे मिळतात, माहिती आहेत?

Salary Account offers

Salary Account Facility  | नोकरी करणा-या प्रत्येक व्यक्तीकडे सॅलरी अकाउंट असतेच. अशात तुमचे सॅलरी अकाउंट एक प्रकारे सेवींग अकाउंट प्रमाणेच काम करते. यात तुमच्या महिन्याचा पगार जमा होत असतो. हे खाते तुम्ही नाही तर तुमची कंपनी खोलत असते. अशात अनेक व्यक्ती सॅलरी अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्यावर ते लगेचच त्यांच्या दुस-या सेविंग अकाउंटमध्ये ट्रांसफर करुन घेतात. अनेकांना सॅलरी अकाउंटमध्ये पैसे ठेवणे सेफ वाटत नाही.

मात्र हा अनेकांचा निव्वळ गैरसमज आहे. सॅलरी अकाउंट खोलल्यावर तुम्हाला पासबुक, एटीएमकार्ड, क्रेडिटकार्ड, नेटबॅंकींग अशा सुविधा मिळतात. तसेच या व्यतीरिक्त देखील हे खाते विविध सुविधा पुरवते. मात्र अनेकांना याची माहिती नाही. सेविंग अकाउंटपेक्षा सॅलरी अकाउंटचे अनेक फायदे आहेत. यात तुम्हाला झिरो बॅलेन्स सलग तीन महिने असेल तरी बॅंक कोणाही दंड आकारत नाही. सेविंग अकाउंटमध्ये तुम्हाला शिल्लक रक्कम नेहमी ठेवावी लागते अन्यथा तुमच्यावर दंड आकारला जातो.

वार्षीक शुल्क आकारले जात नाही
अनेक सॅलरी अकाउंट असलेल्या बॅंका तुम्हाला एटीएम वापरण्यासाठी विशेष सवलत देतात. यात एसबीआय, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी या बॅंकांचा समावेश आहे. यात तुम्हाला एटीएमवर कोणतेही वार्षीक शुल्क आकारले जात नाही. तसेच जेव्हा तुम्ही दुस-या एटीएम मधून पैसे काढता तेव्हा त्याचा एक्स्ट्रा चार्ज भरावा लागत नाही.

लॉकर शुल्कापासून मिळते सुटका
सॅलरी आकाउंटमध्ये अनेक बॅंका तुमचे लॉकर शुल्क माफ करतात. म्हणजे जर तुमच्या खात्यात पगार येत नाही हे बॅंकेला समजते तेव्हा ते तुमचे अकाउंट सेवींगमध्ये बदलतात. त्यात तुम्हाला शुल्क भरावे लागते. यात तुम्ही आधी मिळालेले पासबूक, एटीएम या सर्व सेवा वापरू शकता. एसबीआय बॅंक सॅलरी अकाउंटसाठी लॉकर शुल्क आकारते. यात २५ टक्के लॉकर शुल्क आकारले जाते.

ऑनलाइन सुविधा मोफत
अनेक बॅंका त्यांच्या ग्राहकांना सॅलरी अकाउंटवर ऑनलाइन व्यवहाराची मुभा देतात. यात यात आयएमपीएस आणि स्टॅंडिंग इंस्ट्रक्शनवर शुल्क आकारले जाते. मात्र आरटीजीएस आणि एनएफटी ही सुविधा मोफत आहे. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी या पैकी कोणत्याही बॅंकेत तुमचे सॅलरी अकाउंट असल्यास अनेक सुविधा मिळतात. यात संयुक्त खाते देखील उघडता येते. त्यात तुम्हाला मोफत एअरपोर्ट लाउंजीग, डीमॅट अकाउंट, लॉकरवर २५ टकक्यांची सुट या सुविधा आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Salary Account offers a wide range of facilities with benefits check details on 16 May 2023.

हॅशटॅग्स

Salary Account offers(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x