25 December 2024 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

Salary Spending | भले तुम्हाला मोठा पगार असेल तरीही, या गोष्टींचे पालन केले नाही तर व्हाल कंगाल

Salary Spending

Salary Spending | माझ्याकडे खुप पैसा आहे मात्र लक्ष्मी देवी प्रसन्न नाही त्यामुळे पैसा टिकत नाही. सध्याच्या जगात असे सांगणा-या अनेक व्यक्ती आहेत. आपल्या रोजच्या जिवनात अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गर्जा आहेत. या पूर्ण झाल्या तरी आपल्याला बाकी इतर गोष्टींची जास्त गरज नाही. मात्र अनेक व्यक्ती त्याच्याकडे असलेल्या पैशांनुसार स्वत: ची लाईफ स्टाईल बदलत असतात. अनेक जण गरजेपेक्षा जास्तीचे पैसे चुकीच्या ठिकाणी खर्च करतात.

अशी बरिच उदाहरणे देता येतील ज्यात कमाई कमी आणि खर्च जास्त असतो. पहिले म्हणजे घरात किती सदस्य आहेत त्या नुसार पैशांचे नियोजन करायचे असते. ८० ट्क्के व्यक्ती आपसे पैसे गरजेवर नाही तर चैन पुरवण्यावर खर्च करतात. त्यामुळे पैसे टिकत नाहीत. पगार २० हजार असला तर खर्च ३० जहार करतात. त्यामुळे महिना अखेरीस अशा व्याक्तींना पैसे पुरत नाहीत. त्यामुळे या गोष्टी टाळल्यास तुम्हाला पैशांचे नियोजन करता येईल.

बाहेरचे खाने
अनेक व्यक्ती काही मार्ग नसल्यास बाहेर जेवण करतात. मात्र असेही बरेच आहेत जे जेवण बणवण्याचा कंटाळा आला म्हणून बाहेर जेवायला जातात. यात बराच खर्च होतो. आजकाल जेवण देखील घरपोच मिळते त्यामुळे अनेक जण हा पर्याय निवडतात. मात्र फक्त कंटाळा आला म्हणून बाहेरील जेवण घेतल्याने पैसे जास्त प्रमाणात खर्च होतात.

बाहेर फिरणे
पर्यटानाची अनेक ठिकाणे आहेत. प्रत्येकाने कधीतरी थोडा बदल म्हणून अशा ठिकाणी फिरायला गेले पाहिजे. मात्र काही व्यक्ती बाहेर फिरण्याच्या इतक्या शौकीन असतात की, महिन्यातून दोनदा तरी फिरायला जातात. असे केल्याने देखील खिशात पैसा शिल्लक राहत नाही. कारण पर्यटन स्थळी राहण्या पासून खान्या पिन्या पर्यंत सर्वच गोष्टींवर अतिरिक्त खर्च होतो.

खरेदी
ब-याचदा तुम्ही डी मार्ट किंवा कोणत्याही शॉपिंग मॉलमध्ये जाता तेव्हा तिथे अन्न धान्याच्या वस्तू सर्वात शेवटी ठेवल्या जातात. सुरुवातीला तुमच्या गरजेच्या नसलेल्या मात्र तुम्हाला आकर्षीत करणा-या अनेक वस्तू असतात. त्यामुळे व्यक्ती असा बराच नको तो खर्च करतात. गरज नसताना देखील बिनकामाच्या वस्तू विकत घेतात. हे करणे ठाळले पाहिजे. आपल्या मनावर आपले नियंत्रण असले पाहिजे.

व्यसने
कोणतेही व्यसन माणसाला कंगाल करत असते. दारूचे व्यसन तर फार वाईट. एकदा का धुम्रपाण, दारू, सिगारेट अशा गोष्टींचे व्यसन लागले की ते लवकर सुटत नाही. त्यामुळे आधीच याचे व्यसन स्वत:ला लावून घेऊ नका. कारण याने तुमचे पैसे तर जातीलच पण तुमचे स्वस्थ देखील बिघडेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

 News Title : Salary Spending Avoid unnecessary expenses and save millions 18 October 2022.

हॅशटॅग्स

Salary Spending(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x