19 November 2024 12:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Salasar Exteriors & Contour Share Price Today | हा शेअर 10 पट स्वस्त होणार, स्वस्तात शेअर खरेदी करून फायदा घेणार?

Salasar Exteriors & Contour Share Price

Salasar Exteriors & Contour Share Price Today | ‘सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर जाहीर केली आहे. मजबूत परतावा दिल्यानंतर या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना स्टॉक स्प्लिटचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. ‘सालासार एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर लिमिटेड’ कंपनीने आपल्या स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 227.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Salasar Exteriors & Contour Limited)

‘सालासार एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर लिमिटेड’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स दहा भागात विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. शेअर विभाजनानंतर शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपयांवर येईल. कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर दहा शेअर देणार आहे.

‘सालासार एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर लिमिटेड’ कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी 3 मे 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला होता. रेकॉर्ड तारीख पर्यंत ज्या लोकांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील राहील अशा गुंतवणूकदाराना कंपनी स्टॉक स्प्लिटचा लाभ देईल. स्टॉक विभाजनाचा निर्णय कंपनीने 21 मार्च 2023 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला होता.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर लिमिटेड कंपनीचे पाच टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये 227.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या गुंतवणूकदारांनी 3 वर्षांपूर्वी ‘सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांना आतापर्यंत 669.76 टक्के नफा मिळाला आहे.

मागील 5 वर्षात या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 532.92 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात ‘सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सची किंमत 147 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

‘सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 458.70 रुपये प्रति शेअर होती. तर शेअरची52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 75.05 प्रति शेअर होती. या कंपनीच्या शेअरची किंमत मागील एका वर्षांच्या उच्चांक किमतीवरुन 50 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. स्टॉक आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 203 टक्के वाढला आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत या कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 70.81 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Salasar Exteriors & Contour Share Price Today on 21 April 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x