Sameer Wankhede | अंत्य संस्कारासाठी मुस्लिम, सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? | नवाब मलिकांचा पुन्हा निशाणा
मुंबई, 25 नोव्हेंबर | राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी थोड्या वेळापूर्वीच ट्विट केलं असून त्यामध्ये त्यांनी समीर वानखेडे यांच्या आईच्या मृत्यू दाखल्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यानुसार मलिकांनी दावा केला आहे की, एकाच व्यक्तीच्या दोन वेगवेगळ्या धर्माची नोंद कशी काय करण्यात आली आहे.
Sameer Wankhede. Another forgery, Muslims for funerals and Hindus for government documents? Blessed is Dawood Dnyandev ‘, Nawab Malik shared two documents on Twitter :
आणखी एक फर्जिवाडा, अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य आहे दाऊद ज्ञानदेव’ असं ट्वीट करत नवाब मलिक यांनी ट्विटरवर दोन कागदपत्रं शेअर केले आहेत.
एक और फर्जीवाड़ा,
अंतिम संस्कार के लिए मुसलमान और सरकारी दस्तावेज के लिए हिन्दू ?
धन्य है Dawood Dnyandeo pic.twitter.com/uuM58cjfru— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 25, 2021
नवाब मलिक यांचा नेमका आरोप काय?
आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणानंतर नवाब मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांच्याविरोधात एकामागोमाग एक आरोप करत आहेत. नवाब मलिक यांचा वानखेडेंवर असा आरोप आहे की, समीर वानखेडे हे मूळ मुस्लिम होते. मात्र, सरकारी नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी आपला धर्म बदलला होता. त्यामुळे वानखेडे यांनी घोटाळा करुन सरकारी नोकरी मिळवली आहे. असा मलिक यांचा आरोप आहे.
याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी गुरुवारी (25 नोव्हेंबर) पुन्हा एकदा ट्विट करत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. समीर वानखेडे यांच्या आईच्या (झाएदा ज्ञानदेव वानखेडे) मृत्यू दाखल्यात हिंदू अशी नोंद आहे. तर अंत्य संस्कारासाठी मात्र त्यांची मुस्लिम अशी नोंद आहे. हेच दोन्ही कागदपत्रं नवाब मलिक यांनी ट्विटरवर शेअर केले आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Sameer Wankhede’s mother Muslims for funerals and Hindus for government documents said Nawab Malik.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल