5 February 2025 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या
x

Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन आणि कोलगेट पामोलिव्ह शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाहीर

Samvardhana Motherson Share Price

Samvardhana Motherson Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात बुल्सचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. 20 सप्टेंबर 2023 नंतर आता पहिल्यांदाच निफ्टी-50 इंडेक्सने 20000 अंकांची पातळी ओलांडली आहे. बँक निफ्टी इंडेक्सने देखील 44300 अंकाची पातळी ओलांडली आहे.

शेअर बाजारातील मिडकॅप निर्देशांकाने सलग दहाव्या दिवशी नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. आयटी आणि वाहन सेक्टरेमधील शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली होती. तर निफ्टी ऑटो इंडेक्सने देखील नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती.

शेअर बाजारात उच्चांक पातळी स्पर्श करणाऱ्या शेअरमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे नाव देखील सामील आहे. तर Hero Moto आणि Bajaj Auto या कंपन्यांचे शेअर्स देखील आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर पोहोचले आहेत. भारतात फक्त शेअर बाजार नाही, तर सोन्याने देखील विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. म्हणून गोल्ड फायनान्स कंपन्यांच्या शेअर देखील तेजी आली आहे. मणप्पुरम गोल्ड कंपनीच्या शेअरमध्ये 6 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

मुथूटम फायनान्स कंपनीच्या शेअरध्येही 4 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली आहे. भारतात मागील काही वर्षापासून विजेच्या मागणीत सातत्याने जोरदार वाढ होत आहे. त्यामुळे वीज़ उत्पादक कंपन्यांच्या शेअरमधे तेजी पाहायला मिळत आहे. टोरेंट पॉवर कंपनीचे शेअर्स मागील ट्रेडिंग सेशनमध्ये 12 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.

शेअर बाजारातील तज्ञांनी, गुंतवणुकदारांना संवर्धन मदरसन आणि कोलगेट पामोलिव्ह या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एफआयआयने संवर्धन मदरसन कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी संवर्धन मदरसन कंपनीच्या शेअरवर 95-98 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी संवर्धन मदरसन स्टॉक 1.20 टक्के वाढीसह 93.15 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

शेअर बाजारातील तज्ञांनी कोलगेट पामोलिव्ह कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर आणखी 60-70 रुपये वाढू शकतात. शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.78 टक्के वाढीसह 2,279.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Samvardhana Motherson Share Price NSE 02 December 2023.

हॅशटॅग्स

Samvardhana Motherson Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x