22 January 2025 9:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

Sanofi India Share Price Today | ही कंपनी गुंतवणूकदारांना प्रति शेअर 377 रुपये डिव्हीडेंट देणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या

Sanofi India Share Price

Sanofi India Share Price Today | सध्या शेअर बाजारात मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करण्याची लगबग सुरू आहे. अनेक कंपन्या आपल्या तिमाही निकालासोबत लाभांश देखील जाहीर करत आहेत. यात आता ‘सनोफी इंडिया लिमिटेड’ कंपनीचे नाव देखील सामील झाले आहे. ‘सनोफी इंडिया लिमिटेड’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति इक्विटी शेअर 377 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊ. (Sanofi India Limited)

लाभांश रेकॉर्ड तारीख :
‘सनोफी इंडिया लिमिटेड’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, “23 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीच्या संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीने 194 रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश आणि 10 रुपये दर्शनी मूल्यावर 183 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. कंपनीने या लाभांशासाठी 29 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. ही कंपनी स्टॉक मार्केटमध्ये 28 एप्रिल 2023 रोजी एक्स डिव्हिडंडवर ट्रेड करणार आहे. 22 मे 2023 रोजी किंवा नंतर कंपनी गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांश जमा करेल.

शेअर बाजारात कंपनीची स्थिती :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सनोफी इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.37 टक्क्यांच्या वाढीसह 5,948 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 ‘सनोफी इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के घसरणीसह 5,976.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात ‘सनोफी इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअरच्या किमतीत 4.70 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात ‘सनोफी इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची किंमत 15 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 7200 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5202 रुपये होती.

कंपनीची तिमाहीत कामगिरी :
मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ‘सनोफी इंडिया लिमिटेड’ कंपनीने 671.90 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या कालावधीत कंपनीचा एकूण खर्च 515.40 कोटी रुपये होता. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीने 130.90 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर ‘सनोफी इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात 44.80 टक्क्यांची वाढ नोडवली गेली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sanofi India Share Price Today on 25 April 2023.

हॅशटॅग्स

#Sanofi India Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x
close ad x
Marathi Matrimony