18 April 2025 5:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Sarkari Bank Share | ये काय राव! ही बँक FD व्याज 6-7% देत, पण याच बॅंकेच्या शेअर्सवर 150% परतावा, मग फायदा कुठे?

Sarkari Bank Share

Sarkari Bank Share | बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांनी शेअर बाजाराला अस्थिरतेच्या काळात तग धरून ठेवण्यास मदत केली आहे. या बँकिंग स्टॉकची मागील काही काळापासून कामगिरी लक्षणीय राहिली आहे. शेअर बाजारात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सनी मागील तीन दिवसात आपला स्वतःचा ट्रेडिंग रेकॉर्ड मोडला आहे. या सरकारी मालकीच्या या बँकेच्या शेअरची किंमत आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचली आहे. मे 2022 पासून आतापर्यंत या बँकेच्या शेअर्समध्ये 150 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत – Union Bank of India Share Price
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअरने बीएसई निर्देशांकावर 83.70 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती. 83.70 रुपये ही या बँकेची 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी आहे. मे 2022 या महिन्यात युनियन बँकेचे शेअर 33.55 रुपये किमतीवर पडले होते. मे 2022 पासून या बँकेच्या शेअरची किंमत दोन पट अधिक वाढली आहे. युनियन बँकेने असुरक्षित टियर-2 बाँडद्वारे 2200 कोटी रुपये भांडवल उभारण्याची योजना आखली आहे. ही बातमीबाहेर येताच युनियन बँक ऑफ इंडिया शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे.

नुकताच युनियन बँक ऑफ इंडियाने कार्यकारी अध्यक्ष पदी श्रीनिवासन वर्धराजन यांना नियुक्त केले आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनामध्ये बरेच बदल पाहायला मिळाले आहे. याशिवाय बँकेचा NPA 9 टक्क्यांनी खाली आणण्यासाठी बँक बरेच प्रयत्न करत आहे.

मागील आठवड्यात 50.46 टक्क्यांची वाढ – Union Bank of India Stock Price
युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये मागील आठवड्यात 50.46 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. त्याच वेळी ज्या गुंतवणूकदारांनी या वर्षाच्या सुरुवातीला युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सवर पैसे लावले होते, त्यांना आतपर्यंत 83.69 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेच्या शेअरने मागील वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत या बँकेचे शेअर्स 88 टक्क्यांनी वधारले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Sarkari Bank Share of Union bank of India share price has increased on 1 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Sarkari Bank Share(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या