Sarkari Investment Scheme | 2023 मध्ये जोखीम मुक्त गुंतवणूक करण्यासाठी या सरकारी योजनाची लिस्ट सेव्ह करा, पैसे वाढवा

Sarkari Investment Scheme | 2022 हे वर्ष काही दिवसांनी संपणार आहे. अशा काळात शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. कधी बाजारात जबरदस्त तेजी असते, तर कधी बाजार विक्रीच्या दबावाखाली व्यवहार करत असतो. सध्या जगात कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याच वेळी जगात आर्थिक मंदी येण्याच्या भीतीमुळे शेअर बाजारात नकारात्मक भावना पाहायला मिळत आहे. पुढील काही महिने शेअर बाजारात असाच विक्रीचा दबाव पाहायला मिळेल, कारण कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणुकदार इक्विटी किंवा इक्विटी लिंक्ड योजनामध्ये पैसे लावण्यापेक्षा सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. जर तुम्ही देखील सुरक्षित गुंतवणुक पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसमधील या योजना तुम्हाला जबरदस्त फायदा मिळवून देऊ शकतात.
पोस्ट ऑफीसच्या गुंतवणूक योजना :
पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम गुंतवणुकीसाठी खूप लोकप्रिय आहे. ज्या गुंतवणूकदारांना मार्केट रिस्क घ्यायची नाही, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफीस योजना खूप फायद्याच्या आहेत. राष्ट्रीय बचत योजना, वेळ ठेव योजना, मासिक उत्पन्न योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, सुकन्या समृध्दी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना,राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव योजना, या सर्व पोस्ट ऑफीस तर्फे राबवल्या जाणाऱ्या सर्वोत्तम योजना आहेत.
ठेवींवर सरकारी सुरक्षा हमी :
पोस्ट ऑफिस योजना सुरक्षित मानल्या जातात कारण त्यावर भारत सरकार सुरक्षा हमी प्रदान करते. म्हणजे या योजनेत तुमचे पैसे सुरक्षित असतात. या योजनेत व्याजदर फारसा मिळत नाही मात्र निश्चित दराने हमखास परतावा मिळतो. यामध्ये काही योजनां तुम्हाला कर सवलत ही देतात.
सुकन्या समृद्धी योजना :
* सध्याचा व्याज दर : 7.6 टक्के प्रतिवर्ष
* मॅच्युरिटी कालावधी : 21 वर्षे
* कमाल ठेव रक्कम मर्यादा : 1.50 लाख प्रति वर्ष
* किमान ठेव रक्कम मर्यादा : 250 रुपये
* कर लाभ : EEE श्रेणी.
* वार्षिक 1.50 लाख रुपये गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सावकार मिळते. आणि मुदतपूर्तीवर मिळालेली रक्कमही करमुक्त असते.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी :
व्याज दर : 7.1 टक्के वार्षिक
कमाल गुंतवणूक मर्यादा रक्कम : 1.5 लाख रुपये
किमान गुंतवणूक मर्यादा रक्कम : 500 रुपये
मॅच्युरिटी कालावधी : 15 वर्षे, परंतु 5-5 वर्षे कालावधी वाढवण्याचा पर्याय उपलब्ध
कर लाभ : EEE श्रेणी. म्हणजेच या योजनेत तुम्हाला वार्षिक 1.50 लाख रुपये गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलत दिली जाते. गुंतवणुकीवर मिळणारा व्याज आणि मुदतपूर्तीवर मिळालेल्या रकमेवर कोणताही कर भरावा लागणार नाही.
मासिक उत्पन्न योजना :
* वार्षिक व्याज दर : 6.7 टक्के
* मॅच्युरिटी कालावधी : 5 वर्षे
* कमाल गुंतवणूक मर्यादा : 4.50 लाख एकल खाते, 9 लाख संयुक्त खाते
* कर लाभ : नाही
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र :
* वार्षिक व्याज दर : 6.8 टक्के वार्षिक
* मॅच्युरिटी कालावधी : 5 वर्षे
* कमाल ठेव मर्यादा राक्कम : कोणतीही मर्यादा नाही
* किमान ठेव मर्यादा रक्कम : 1000 रुपये
* कर लाभ : 1.50 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत दिली जाईल.
मुदत ठेव योजना :
* योजनेवर मिळणारा व्याज परतावा : 5.5 टक्के
* 2 वर्षाच्या योजनेवर व्याज : 5.7 टक्के.
* 3 वर्षांच्या योजनेवर व्याज : 5.8 टक्के
* 5 वर्षांच्या योजनेवर व्याज : 6.7 टक्के
* कमाल ठेव मर्यादा रक्कम : मर्यादा नाही
* किमान ठेव मर्यादा रक्कम : 1000 रुकाये
* कर लाभ : 1.50 लाखपर्यंत गुंतवलेल्या रकमेवर आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सावकार दिली जाते. परंतु व्याजातून मिळणारे उत्पन्न 40 हजार पेक्षा जास्त असल्यास टीडीएस कापला जाईल. आणि ज्येष्ठ नागरिकांना TDS मर्यादा 50000 आहे.
किसान विकास पत्र :
* परतावा व्याज दर : वार्षिक 7 टक्के
* परिपक्वता कालावधी : 123 महिने
* कमाल ठेव मर्यादा रक्कम : मर्यादा नाही
* किमान ठेव मर्यादा रक्कम : 1000 रुपये
* कर लाभ : नाही
रिकरिंग डिपॉझिट :
* परतावा व्याज दर : 5.8 टक्के
* कमाल ठेव रक्कम मर्यादा : कोणतीही मर्यादा नाही
* किमान ठेव मर्यादा रक्कम : 100 रुपये मासिक
* मॅच्युरिटी कालावधी : 5 वर्षे, दर 5 वर्षांनी कालावधी वाढवत येतो.
* कर लाभ : RD गुंतवणुकीतून मिळणारे व्याज उत्पन्न 40,000 रुपयांपेक्षा अधिक असेल तर 10 टक्के TDS कापला जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी TDS मर्यादा 50,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना :
* वार्षिक व्याज दर : 7.6 टक्के
* योजनेचा मॅच्युरिटी कालावधी : 5 वर्षे
* कमाल ठेव मर्यादा रक्कम : 15 लाख रुपये
* किमान ठेव मर्यादा रक्कम : 1000 रुपये
* कर लाभ : 1.50 लाख प्रतिवर्ष
गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलत दिली जाते. तथापि, आर्थिक वर्षात मिळालेले व्याज 50,000 रुपये पेक्षा अधिक असल्यास TDS कापला जाईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Sarkari Investment Scheme for earning huge returns in long term investment on 27 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL