18 November 2024 10:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स शेअरने 1 वर्षात दुप्पट परतावा दिला, आता दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्स प्लस स्टॉक स्प्लिट

Sarveshwar Foods Share Price

Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून अप्पर सर्किट तोडत आहेत. काल आणि आज अशा दोन्ही दिवशी हा स्टॉक 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. स्टॉकमध्ये इतकी जबरदस्त वाढ होण्याचे कारण म्हणजे, सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. (Sarveshwar Share Price)

यासह कंपनी आपले शेअर्स स्प्लिट देखील करणार आहे. म्हणूनच या कंपनीच्या शेअर्समध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटसह 113.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के वाढीसह 123.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सर्वेश्वर फूड्स स्टॉक स्प्लिट :

सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 10 तुकड्यामध्ये विभाजित करणार आहे. यासोबतच सर्वेश्वर फूड्स कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना शेअरसाठी 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे.

रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदाराच्या डिमॅट खात्यात सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचा एक शेअर असेल, त्यांना स्टॉक स्प्लिट आणि बोनस इश्यूनंतर एका शेअरच्या बदल्यात 30 शेअर्स मिळतील. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख अजून जाहीर केली नाहीये.

मागील 1 वर्षात सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील एका वर्षात सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना तब्बल 126.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिनाभरात सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअरने लोकांना 79.35 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत मागील सहा महिन्यात 59.72 टक्के वाढली आहे. सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 113.80 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 43.45 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sarveshwar Foods Share Price today on 03 August 2023.

हॅशटॅग्स

Sarveshwar Foods Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x