7 January 2025 5:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER EPF Withdrawal | पगारदारांनो, या कारणांचा वापर करून EPF खात्यातून पैसे काढू शकता, 90 लोकांना माहित नाही Reliance Share Price | रिलायंस इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 64 टक्केपर्यंत परतावा - BOM: RELIANCE
x

Sarveshwar Foods Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सर्वेश्वर फूड्स शेअरने 3 वर्षात 1468% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्स

Sarveshwar Foods Share Price

Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने कोविड नंतरच्या रीबाउंडमध्ये आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून दिली होती. एप्रिल 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 8.45 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आता हा स्मॉल कॅप मल्टीबॅगर स्टॉक 140 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1468.05 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत धावत आहेत. आज मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.77 टक्के वाढीसह 138 रुपये किमतीवर (NSE Morning 10:45) ट्रेड करत आहेत.

बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट

सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यात विभाजित करणार आहे. नुकताच सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती.

कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 10 तुकड्यात विभाजित करण्याची घोषणा केली होती. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी 15 सप्टेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.

शेअरची कामगिरी

मागील एका महिन्यात सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 84.50 रुपयेवरून वाढून 140 रुपयेपर्यंत वाढली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 56.8 टक्के परतावा कमावून दिला आहे.

YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 88.50 रुपयेवरून वाढून 140 रुपयेवर पोहचली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. मागील.एका वर्षात सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 167.68 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sarveshwar Foods Share Price today on 05 September 2023.

हॅशटॅग्स

Sarveshwar Foods Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x