22 February 2025 3:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

SBI Account | तुम्हाला बँकेत खातं उघडायचं आहे? मग फक्त आधार कार्डच्या मदतीने SBI मध्ये ऑनलाईन खाते उघडू शकता, या आहेत स्टेप्स

SBI account

SBI Account | SBI बँकमध्ये इन्स्टा बचत खाते उघडण्यासाठी तुम्हाला आता बँकेच्या शाखेला जाऊन भेट देण्याची आणि कोणत्याही कागदपत्रांची शोधाशोध करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरीबसून SBI बँकमध्ये इन्स्टा बचत खाते उघडू शकता.

ठळक मुद्दे :
* SBI ने एक खास Insta Savings Account सुविधा सुरु केली आहे.
* SBI मध्ये खाते उघडणे आता झाले सोपे
* तुम्ही घरबसल्या SBI मध्ये Insta Saving Bank खाते आधारकार्ड वापरून उघडू शकता

आजकाल बँकांच्या बहुतांश सर्व सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. खासगी बँका ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्यात नेहमीच पुढे आहे. परंतु आता स्टेट बँकेसारख्या सरकारी बँका यात अजिबात मागे नाहीत. SBI आपल्या सर्व सेवा वेगाने ऑनलाईन उपलब्ध करत आहे. SBI ने एक खास Insta Savings Account सुविधा देखील सुरु केली आहे. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते उघडणे आता खूप सोपे होईल. विशेष बाब म्हणजे इन्स्टा खाते उघडण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची शोधाशोध करावी लागणार नाही. किंवा बँकेच्या शाखेत जाण्याची कोणतीही गरज नाही. तुम्ही तुमच्या घरात बसूनच SBI मध्ये Insta Saving Bank खाते ऑनलाईन उघडू शकता.

SBI Insta Savings Bank Account ही सुविधा आधार कार्डवर आधारित एक इन्स्टंट डिजिटल बचत खाते उघडण्याची यंत्रणा आहे. याच्या मदतीने, ग्राहक बँकेच्या YONO ॲप द्वारे ऑनलाईन खाते उघडू शकतात. या खात्यामुळे ग्राहकांना सर्व प्रकारच्या सामान्य बँकिंग सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या जातील. ग्राहक त्यांचे KYC पूर्ण करण्यासाठी एका वर्षाच्या आतमध्ये नजीकच्या बँकेच्या शाखेला भेट देऊ शकतात.

इन्स्टा सेव्हिंग्स अकाउंटची वैशिष्ट्ये :
SBI डिजिटल बँकिंग सुविधा तांत्रिकदृष्ट्या मजबूत करण्याकडे लक्ष देत आहे. इन्स्टा सेव्हिंग्ज बँक ह्याचा एक भाग आहे. इन्स्टा बचत खात्याच्या मदतीने खातेधारकांना 24×7 बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. SBI Insta Savings बँक खात्यातील सर्व नवीन खातेधारकांना एक वैयक्तिक RuPay ATM डेबिट कार्ड उपलब्ध करून दिला जाईल.

मिनिमम बॅलन्सचा टेन्शन नाही :
विशेष म्हणजे या खात्यात तुम्ही किमान शिल्लक ठेवली नाही तर तुम्हाला कोणताही दंड लावला जाणार नाही. यामध्ये किमान शिल्लक रक्कम नसल्यास बँक कोणतेही शुल्क आकारणार नाही. त्यामुळे तरुणांसाठी ही एक चांगली सुविधा ठरेल हे नक्की. बँकेच्या YONO अॅपच्या मदतीने अॅमेझॉन सारख्या ईकॉमर्स वेबसाइटवर वस्तू खरेदी मध्ये सुट देखील दिली जाईल.

खाते उघडण्याची प्रक्रिया :
* SBI Insta Savings Bank खाते उघडण्यासाठी ग्राहकांना बँकेचे अधिकृत YONO अॅप डाउनलोड करावे लागेल.
* यानंतर, तुम्हाला तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर टाकून ओटीपी सबमिट करावा लागेल आणि इतर माहिती भरावी लागेलं.
* SBI Insta Savings Bank खातेधारकाना देखील नामांकनाची सुविधा देण्यात आली आहे.
* एसएमएस अलर्ट आणि एसबीआय क्विक मिस्ड कॉल सेवेसह व्यक्तीचे नामांकन केले जाऊ शकते.
* माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, खातेदाराचे खाते त्वरित सक्रिय केले जाईल आणि तो लगेच ऑनलाईन व्यवहार सुरू करू शकेल.
* ग्राहक त्यांचे KYC पूर्ण करण्यासाठी एका वर्षाच्या आत कधीही जवळच्या SBI बँकेच्या शाखेला भेट देऊन कागदपत्र जमा करू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI account opening procedure by using official YONO app on 23 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bank Account opening(3)SBI account(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x