19 September 2024 11:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | 23 रुपयाचा येस बँक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, संधी सोडू नका - Marathi News Kareena Kapoor | सध्याच्या यंग ॲक्ट्रेसला देखील टाकलं मागे, करीना कपूरच्या हाती लागलाय मोठा प्रोजेक्ट - Marathi News Loan EMI Alert | तुम्ही सुध्दा कर्ज घेताना ही चुक केली असेल तरी चिंता नको, या ट्रिकने कर्जाचं ओझं कमी होईल - Marathi News Money Value | तुमची बचत करत असालच, पण भविष्यात त्या पैशाची किंमत किती असेल जाणून घ्या - Marathi News SBI Mutual Fund | खुशखबर, SBI म्युच्युअल फंडाची नवीन योजना लॉन्च, आजच SIP करा, भविष्यात मोठी रक्कम मिळेल - Marathi News Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News
x

SBI Annuity Deposit Scheme | होणार गॅरंटीड कमाई! SBI च्या या योजनेत गुंतवणुकीवर दर महिन्याला परतावा मिळेल - Marathi News

SBI Annuity Deposit Scheme

SBI Annuity Deposit Scheme | एसबीआय अंतर्गत पगारदारांसाठी अनेकानेक योजना राबविल्या जातात. दरम्यान होम लोन असो किंवा पैसे डिपॉझिट करायचे असो आपल्याला जिथे चांगला रिटर्न मिळतो तिथेच आपण पैसे गुंतवणुकीचा विचार करतो. अशातच एसबीआय ॲन्युटी डिपॉझिट स्कीम या योजनेमध्ये तुम्ही एकरक्कमी पैसे गुंतवू शकता.

एसबीआय बँक ही सरकारी बँक असल्यामुळे तुम्ही दिलेले एकरकमी पैसे बुडण्याची अजिबात भीती बाळगू नका. सोबतच ही डिपॉझिट स्कीम रिटायरमेंटनंतर प्रत्येक महिन्याला इन्कम सुरू रहावी असं वाटणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांवर तुम्हाला प्रत्येक महिन्याला रोजच्या वापरासाठी एक प्रिन्सिपल अमाऊंट मिळते. या भन्नाट योजनेचा पिरियड तसेच प्रीमॅच्युअर विड्रॉल, लोन सुविधा त्याचबरोबर किती दिवसानंतर ॲन्युटी मिळते या सर्व गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लोन सुविधा :
एसबीआयच्या योजनेअंतर्गत तुम्हाला लोन सुविधा मिळते. यामध्ये नॉमिनेशन सुविधा फक्त इंडिव्हिजवल व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. गरज भासल्यानंतर अकाउंटमध्ये उपलब्ध असणाऱ्या बॅलेन्सवर 75% ओवरड्राफ्ट कर्ज मिळू शकते. परंतु तुम्ही लोन घेत असाल तर ॲन्युटी पेमेंट लोन अकाउंटमध्ये क्रेडिट होणार.

किती वर्षांसाठी रक्कम जमा होते :
या स्कीमचा फायदा घेण्यासाठी तुम्ही एसबीआयच्या कोणत्याही ब्रांचमध्ये जाऊन योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेमध्ये मॅक्झिमम डिपॉझिटची कोणतीच लिमिट नाही आहे. एसबीआयच्या या स्कीममध्ये तुम्ही 36, 60, 84 आणि 120 महिन्यांसाठी रक्कम जमा करू शकता. म्हणजेच तुमच्याकडे असणारे पैसे योग्य ठिकाणी गुंतवून तुम्ही दहा वर्षांसाठी स्वतःचा अर्निंग सोर्स तयार करू शकता. जेवढ्या टेनॉरसाठी तुम्ही रक्कम जमा केली आहे तेवढ्याच टेनॉरच्या एफडीवर मिळणारे व्याज या स्कीमवर लागू होते.

डिपॉझिट केल्यानंतर पुढच्याच महिन्यात इनकम होते सुरू :
पैसे डिपॉझिट केल्यानंतर लगेच पुढच्या महिन्यापासून तुम्हाला दरमहा इन्कम सुरू होते. संपूर्ण रक्कम जमा केल्यानंतर तुम्हाला एक युनिवर्सल पासबुक दिले जाते. दरम्यान मिनिमम ॲन्युटी दरमहा 1000 रुपये आहे.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार चांगला लाभ :
एसबीआयच्या ॲन्युटी डिपॉझिट स्कीम अंतर्गत तुम्ही सिंगल आणि जॉईंट दोन्ही प्रकारे अकाउंट ओपन करू शकता. यामध्ये सीनियर सिटीजन आणि सामान्य कस्टमरला टर्म डिपॉझिटच्या आधारावर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 % अधिक व्याज मिळते. त्याचबरोबर ॲन्युटी पेमेंटवर टीडीएस कापून करंट अकाउंट किंवा लिंक्ड सेविंग अकाउंटमध्ये जमा केले जाते.

प्रीमॅच्युअर विड्रॉल :
तुम्ही अकाउंटमध्ये 15 लाख रुपयांपेक्षा जास्त अमाऊंट जमा केली असेल तर, 15 लाख रक्कम काढल्यानंतर उर्वरित रक्कम खात्यात जमा केली जाते. पंधरा लाख रुपयांच्या ठेवीवर मॅच्युरिटी पेमेंट करण्याची परवानगी असते. परंतु तुमच्याकडून पेनल्टी चार्ज आकारला जातो. त्याचबरोबर पैसे ठेवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर, वेळे आधीच तुम्ही ही स्कीम बंद करू शकता.

Latest Marathi News | SBI Annuity Deposit Scheme 10 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SBI Annuity Deposit Scheme(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x