19 November 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर फोकसमध्ये, आली मोठी अपडेट, शेअर पुन्हा मजबूत परतावा देणार - NSE: IRFC SBI Mutual Fund | सरकारी SBI फंडाची श्रीमंत बनवणारी योजना, केवळ 2500 रुपयांची बचत देईल 1.18 करोड रुपये - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

SBI Card Payment | SBI क्रेडिट कार्ड ग्राहकांना झटका, क्रेडिट कार्डवर आकारणार अतिरिक्त शुल्क, वाचा कोणत्या गोष्टीवर जास्त चार्ज लागणार

SBI Card Payment

SBI Card Payment | जर तुम्ही SBI क्रेडिट कार्डचे वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. दिवाळीपूर्वी SBI च्या क्रेडिट कार्डधारकांना मोठा धक्का मिळाला आहे. SBI ने जाहीर केले आहे की, यापुढे ते SBI क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या रेंट पेमेंटवर प्रक्रिया शुल्क आकारले जाणार आहे. ग्राहकांना पाठवलेल्या SMS नुसार, SBI कार्ड कंपनी आपल्या क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या रेंट पेमेंटवर 99 रुपये अधिक GST चार्ज आकारणार आहे. हा नवीन नियम 15 नोव्हेंबर 2022 पासून लागू होईल. याशिवाय SBI कार्ड्सने EMI पेमेंट करण्यावरही प्रक्रिया शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने EMI पेमेंट करण्यावरही प्रक्रिया शुल्क 99 रुपयांवरून वाढवून 199 रुपये केले आहे. अशा EMI व्यवहारांवर 18 टक्के दराने GST देखील आकारला जाणार आहे.

SBI ने ग्राहकांना पाठवलेला SMS :
SBI कार्डचे नवीन नियम 15 नोव्हेंबर 2022 पासून लागू होईल. SBI आपल्या ग्राहकांना खालीलप्रमाणे SMS पाठवून सूचना देत आहे. “प्रिय SBI क्रेडिट कार्डधारक, तुमच्या क्रेडिट कार्डवरील काही ठराविक व्यवहारांवर 15 नोव्हेंबर 22 पासून सुधारित शुल्क आकारले जातील. अधिक माहितीसाठी, ग्राहकांनी SBI कार्ड कंपनीच्या वेबसाइटला भेट द्यावी”.

ICICI आधीच वाढवले होते हे शुल्क :
मागील महिन्यात ICICI बँकेने जाहीर केल्या एका निवेदनाद्वारे जाहीर केले होते की, क्रेडिट कार्डद्वारे रेंट भरल्यास 1 टक्के प्रक्रिया शुल्क आकारले जाणार आहे. 20 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दराने प्रक्रिया शुल्क वसुली केली जाईल. ICICI बँकेने आपल्या क्रेडिट कार्डधारकांना पाठवलेल्या एसएमएसमध्ये म्हटले होते की, “प्रिय ICICI क्रेडिट कार्डग्राहक, 20-10-2022 पासून, तुमच्या ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवरील रेंट पेमेंटवरील सर्व व्यवहारांवर 1 टक्के शुल्क आकारले जाईल.”

थर्ड पार्टी अॅप्सद्वारे भाड्याचे पेमेंट :
सामान्यतः Paytm, Freecharge, Mobikwik, Cred, RedGiraffe, MyGet, Magicbricks यासारखे थर्ड पार्टी अॅप्स असतात जे लोकांना क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंट करण्याची सुविधा देतात. हे थर्ड पार्टी अॅप्स क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंट केल्यावर सुविधा शुल्क देखील वसूल करतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SBI Card Payment on rent has increased by SBI credit card company on 17 October 2022.

हॅशटॅग्स

SBI Card Payment(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x