16 April 2025 11:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांसाठी खुशखबर! आता 'या' 5 FD योजनांवर 7.9 टक्के व्याज मिळणार

SBI FD Interest Rates

SBI FD Interest Rates | जर तुमचंही देशातील सर्वात मोठ्या बँकेत खातं असेल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. एसबीआय एफडी स्कीममधून अनेक खास एफडी आणि मुदत ठेवी उपलब्ध आहेत. जर तुम्हीही फिक्स्ड डिपॉझिट करणार असाल तर त्याआधी जाणून घ्या कोणत्या योजनेला जास्त व्याजाचा फायदा मिळत आहे.

एसबीआयच्या टॉप-5 योजना

एसबीआय अमृत कलश, एसबीआय वीकेअर, एसबीआय ग्रीन डिपॉझिट, एसबीआय उत्तम अशा अनेक योजनांवर 7.9 टक्क्यांपर्यंत व्याजाचा लाभ मिळत आहे.

एसबीआय अमृत कलश योजना
एसबीआय ‘अमृत कलश’ योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात 400 दिवसांसाठी एफडीवर 7.6 टक्के दराने व्याज मिळते. अमृत कलश स्पेशल एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना 7.10% टक्के व्याज मिळणार आहे. या योजनेत तुम्ही 31 मार्च 2024 पर्यंत गुंतवणूक करू शकता. ही एसबीआयची खास एफडी योजना आहे.

एसबीआय वीकेअर
एसबीआय वीकेअर योजनेत केवळ ज्येष्ठ नागरिकच गुंतवणूक करू शकतात. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 5 ते 10 वर्षांच्या कालावधीवर सर्वाधिक व्याजाचा लाभ मिळतो. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. या योजनेअंतर्गत 5 वर्ष ते 10 वर्षांच्या एफडीवर 7.50% व्याज मिळते. बँक ग्राहकांना 7 दिवसते 10 वर्षांपर्यंतएफडी मिळत आहे. त्यावर 3.5 ते 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे.

एसबीआय ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट
एसबीआय कस्टमर ग्रीन टर्म डिपॉझिटमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 1111 दिवस आणि 1777 दिवसांच्या कालावधीवर 7.15 टक्के दराने व्याज मिळते. याशिवाय ग्राहकांना 2222 दिवसांच्या कालावधीवर 7.40 टक्के दराने व्याज मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांबद्दल बोलायचे झाले तर या लोकांना 1111 दिवस आणि १७७७ दिवसांच्या कालावधीवर 6.65 टक्के दराने व्याज मिळत आहे. बँक 2222 दिवसांच्या मुदतीच्या रिटेल डिपॉझिटवर 6.40% व्याज देते.

एसबीआय बेस्ट टर्म डिपॉझिट स्कीम
एसबीआयच्या या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही फक्त एक वर्ष आणि 2 वर्षांची योजना आहे. एसबीआय श्रेष्ठ योजनेत सर्वसामान्य ग्राहकांना 2 वर्षांच्या ठेवीवर म्हणजेच एफडीवर 7.4 टक्के व्याज मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेवर 7.90 टक्के व्याज मिळत आहे. तर, एक वर्षाच्या गुंतवणुकीवर सर्वसामान्यांना 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज मिळत आहे.

एसबीआय अ‍ॅन्युइटी डिपॉझिट योजना
एसबीआय अ‍ॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करावी लागते. या योजनेत ठेवीदाराला मूळ रकमेच्या काही भागासह दरमहा व्याज दिले जाते. हे व्याज बँकेच्या मुदत ठेवी अर्थात एफडीइतके असते. अ‍ॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी पैसे जमा केले जातात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : SBI FD Interest Rates 2024 check details 13 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SBI FD Interest Rates(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या