20 January 2025 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY करावा की SELL - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट तेजीत, 5 दिवसात 25 टक्के कमाई, पुढेही मालामाल करणार - NSE: IDEA TTML Share Price | 79 रुपयाचा TTML शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा, यापूर्वी 3100% परतावा दिला - NSE: TTML Zero Tax on Salary | महिना पगार 1 लाख रुपये असेल तरी 1 रुपयाही इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही, 90% पगारदारांना माहित नाही Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा NHPC Share Price | 80 रुपयाचा एनएचपीसी शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

SBI Gold Deposit Scheme | घरात सोनं आहे पण वापरात नाही? | अशी करा कमाई

SBI Gold Deposit Scheme

मुंबई, 08 ऑक्टोबर | अनेकदा घरामध्ये असणाऱ्या सोन्याच्या वापर केला जात नाही. ते लॉकरमध्ये पडून राहतं, दरम्यान याच सोन्यातून तुम्ही कमाई करू शकता. जर तुम्हाला सोन्यातून कमाई करायची असेल तर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये जमा करू शकता. एसबीआयची रिव्हॅम्पड गोल्ड डिपॉझिट योजना म्हणजेच आर-जीडीएस (SBI Gold Deposit Scheme) मुदत ठेवीप्रमाणे काम करते. या योजनेअंतर्गत ग्राहक त्यांचे सोने जमा करू शकतात आणि व्याजाच्या स्वरूपात रक्कम मिळवू शकतात.

SBI Gold Deposit Scheme. If you want to earn from gold, you can deposit in SBI. SBI’s Revamped Gold Deposit Scheme works like R-GDS term deposit. Under this scheme, customers can deposit their gold and get the amount in the form of interest :

एसबीआयच्या वेबसाइटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. स्वतंत्र व्यक्तीप्रमाणे या योजनअंतर्गत प्रोपराइटर आणि पार्टनरश‍िप फर्म, एचयूएफ (हिंदू अविभाजित परिवार), सेबीमध्ये रजिस्‍टर्ड म्युच्युअल फंड/ एक्सचेंज-ट्रेडेड फंड आणि कंपन्या, धर्मार्थ संस्थान किंवा सेंट्रल आणि स्‍टेट गव्हर्नमेंटच्या मालकी हक्काखालील यूनिट्स देखील यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

किती जमा करता येईल सोनं?
कमीतकमी 10 ग्रॅम कच्चे सोने (बार, नाणी, दागिने, विशिष्ट खडे आणि धातू वगळता) या योजनेत जमा करता येईल. शिवाय जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही आहे.

गुंतवणूक करण्याचे आहेत तीन पर्याय:
* शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट (STBD)- कालावधी 1 ते 3 वर्ष
* मीडियम टर्म गव्हर्नमेंट डिपॉझिट (MTGD)- कालावधी 5-7 वर्ष
* लॉन्ग टर्म गव्हर्नमेंट डिपॉझिट (LTGD)- कालावधी 12-15 वर्ष

किती मिळेल व्याज ?
एका वर्षासाठी अल्प मुदतीच्या बँक ठेवींवर वार्षिक 0.50% दिलं जातं आहे. जर तुम्ही 1-2 वर्षांसाठी सोनं बँकेत जमा केलं तर त्यावर 0.55% व्याज मिळेल. जर 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांसाठी सोनं जमा केलं तर त्यावर 0.60 टक्के व्याज मिळेल. मध्यम मुदतीच्या सरकारी ठेवी किंवा एमटीजीडी वर वार्षिक 2.25 % व्याज दिलं जातं.

* MTBD वरील व्याज- 2.25 टक्के प्रति वर्ष
* LTGD वरील व्याज- 2.50 टक्के प्रति वर्ष

काय आहे रिपेमेंटची प्रक्रिया?
एसटीबीडी: तुम्हाला या सोन्यासाठीची रक्कम एकतर सोन्याच्या स्वरुपात किंवा मॅच्युरिटीच्या तारखेला असणाऱ्या समकक्ष किंमतीमध्ये घेण्याचा पर्याय मिळेल.

MTGD आणि LTGD: ठेवीची पूर्तता सोन्यामध्ये किंवा सध्याच्या प्रचलित किमतीनुसार सोन्याच्या मुल्याएवढ्या किंमतीत असेल. तथापि, गोल्ड रिडम्पशन झाल्यास 0.20% प्रशासकीय शुल्क आकारले जाईल.

या कागदपत्रांची आवश्यकता:
या योजनेंतर्गत सोन्याला कच्चं सोनं म्हणून स्वीकारलं जातं, म्हणजे सोन्याच्या पट्ट्या, मौल्यवान दगडं आणि इतर धातू, सोन्याचे दागिने स्वरूपात साठवले जातात. यासाठी अर्ज, ओळखपत्र, पत्ता प्रमाणपत्र आणि यादी फॉर्म भरून द्यावे लागणार आहेत. एसटीबीडीमध्ये परिपक्वतेच्या तारखेला सोन्यातील मूळ रक्कम किंवा रुपयांमध्ये रक्कम निवडण्याचा पर्याय आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: SBI Gold Deposit Scheme to earn interest from gold.

हॅशटॅग्स

#Gold(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x