22 November 2024 12:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

SBI Pension Seva | पेन्शनधारकांसाठी SBI च्या ‘या’ सेवा घसरबसल्या मिळतील | सुविधा जाणून घ्या

SBI Pension Seva

मुंबई, १६ सप्टेंबर | सबीआयने (SBI) पेन्शनधारकांसाठी वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. SBI चे ज्येष्ठ नागरिक ग्राहक आता https://www.pensionseva.sbi/ वर जाऊन पेन्शनसंबंधी सर्व माहिती मिळवू शकतात. परंतु अगोदर येथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर लॉगइन करून वापर करू शकता. स्टेट बँकेंने ट्विट करून वेबसाइटबाबत सांगितले आहे.

SBI Pensioners Service, पेन्शनधारकांसाठी SBI च्या ‘या’ सेवा घसरबसल्या मिळतील, सुविधा जाणून घ्या – SBI Bank home services information for pensioners :

वेबसाइटवर मिळतील या सुविधा:
1. या वेबसाइटवर यूजर्स एरियर कॅलक्युलेशन शीट डाऊनलोड करू शकतात.
2. पेन्शन स्लिप किंवा फॉर्म 16 सुद्धा डाऊनलोड करू शकतात.
3. पेन्शन प्रोफाईल डिटेलची माहिती येथे उपलब्ध होईल.
4. गुंतवणुकीची माहिती मिळेल.
5. लाईफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीच्या दाखल्याचे स्टेटस सुद्धा तपासता येईल.
6. बँकेत केलेल्या ट्रांजक्शनची माहितीसुद्धा या वेबसाइटवर मिळेल.

SBI Pension Seva Extended benefit to pensioners :

वेबसाइटवर रजिस्ट्रेशननंतर मिळतील या सुविधा:
* या वेबसाइटवर रजिस्ट्रेशननंतर जेव्हा तुमच्या खात्यात पेन्शन येईल, त्याची माहिती तुमच्या फोन नंबरवर दिली जाईल.
* ब्रँच लाईफ सार्टिफिकेटची सुविधासुद्धा मिळेल.
* पेन्शन स्लिप मेलद्वारे दिली जाईल.
* यासोबतच स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत आपले लाईफ सर्टिफिकेट सबमिट करता येईल.

हेल्पालाईनवर करू शकता तक्रार:
वेबसाइट ऑपरेट करताना ज्येष्ठांना कोणतीही समस्या येऊ नये यासाठी एसबीआयने हेल्पलाइन नंबरसुद्धा जारी केला आहे. काही समस्या आल्यास एरर स्क्रीन शॉटसह [email protected] वर तक्रार ईमेल करू शकता.

SMS सेवा आणि कस्टमर केअर नंबर:
याशिवाय 8008202020 नंबरवर UNHAPPY टाईप करून एसएमएससुद्धा करू शकता. सोबतच बँकेने कस्टमर केयर नंबर 18004253800/1800112211 किंवा 08026599990 सुद्धा जारी केला आहे, ज्यावर कॉल करून समस्या सांगू शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: SBI Pension Seva information for pensioners.

हॅशटॅग्स

#SBI(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x