
SBI Share Price | भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊस कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ( स्टेट बँक ऑफ इंडिया अंश )
ब्रोकरेज हाऊसने एसबीआय बँकेच्या शेअर्सवर 850 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसबीआय बँकेचे शेअर्स 746.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी एसबीआय बँकेचे शेअर्स 2.93 टक्के वाढीसह 770 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
तज्ञांच्या मते, एसबीआय बँकेचे शेअर्स पुढील काळात 14 टक्के वाढू शकतात. 2024 या वर्षात एसबीआय बँकेचे शेअर्स 16 टक्के मजबूत झाले आहेत. 1 जानेवारी 2024 रोजी एसबीआय बँकेचे शेअर्स 641.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 29 फेब्रुवारी 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 746.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील 6 महिन्यांत एसबीआय बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 33 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत बँकेचे शेअर्स 561.30 रुपयेवरून वाढून 746.15 रुपये किमतीवर पोहचले आहेत. एसबीआय बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 777.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 501.85 रुपये होती.
सिटी फर्मने बँक ऑफ बडोदाचे शेअर्स देखील खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञाच्या मते, बँक ऑफ बडोदाचे शेअर्स पुढील काळात 290 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. यासह सिटी फर्मने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स विकून नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. सिटीने स्टेट बँकेच्या शेअर्सवर 600 रुपये आणि पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्सवर 83 रुपये डाऊन साईट टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 121.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























