15 January 2025 4:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

SBI Special FD | SBI बँकेच्या 'या' जबरदस्त स्कीमला मुदतवाढ, बँकेत गर्दी, मोठ्या व्याजदरा सह मिळेल मोठा परतावा - Marathi News

Highlights:

  • SBI Special FD
  • अमृत कलश योजनेत किती टक्के व्याजदर दिले जाते :
  • ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करू शकता गुंतवणूक :
  • जास्तीत जास्त एवढी गुंतवणूक करू शकता :
  • फिक्स डिपॉझिटवर मिळेल एवढं व्याज :
SBI Special FD

SBI Special FD | एफबीआय अंतर्गत खास अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यामधील ज्येष्ठांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देणारी ‘अमृत कलश योजना’ सामान्यांपासून ते ज्येष्ठांसाठी अत्यंत फायद्याची योजना आहे.

एसबीआयच्या अमृत कलश योजनेची मुदतवाढ करण्यात आली आहे. पहिले नागरिक केवळ 30 सप्टेंबरपर्यंतच या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकत होते. परंतु आता 2025 च्या 31 मार्च या तारखेपर्यंत अमृत कलश योजनेमध्ये पैसे गुंतवू शकणार आहात. ही योजना ज्येष्ठांना अधिक लाभ मिळवून देते. त्याचबरोबर या योजनेचा कार्यकाळ 400 दिवसांचा आहे. 400 दिवसांमध्ये तुम्ही चांगली गुंतवणूक करून स्वतःचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊ शकता.

अमृत कलश योजनेत किती टक्के व्याजदर दिले जाते :
वरील सांगितल्याप्रमाणे एफबीआयच्या अमृत कलश योजनेमध्ये ज्येष्ठांना सर्वसामान्य नागरिकांपेक्षा जास्तीचे व्याजदर दिले जाते. ज्यामध्ये ज्येष्ठांना 7.60% वार्षिक व्याजदर दिले जाते तर, सर्वसामान्यांना 7.10% वार्षिक व्याजदर दिले जाते.

ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करू शकता गुंतवणूक :
अमृत कलश योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही या योजनेत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करू शकता. घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला एसबीआय योनो ॲप आणि नेट बँकिंगचा वापर करून गुंतवणूक करावी लागेल. अशातच ऑफलाइन पद्धतीने गुंतवणुकीसाठी तुम्हाला संबंधित बँक शाखेमध्ये जावं लागेल.

जास्तीत जास्त एवढी गुंतवणूक करू शकता :
एसबीआयची अमृत कलश योजना ही एक स्पेशल रिटेल टर्म डिपॉझिट योजना आहे. त्याचबरोबर या योजनेतून तुम्ही जास्तीत जास्त 2 करोड रुपयांची एफडी जमा करू शकता. तुमच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाचा परतावा हा दरमहा, ती नाही किंवा सहामाही आधारावर दिला जातो.

फिक्स डिपॉझिटवर मिळेल एवढं व्याज :
एसबीआयच्या एफडीत सामान्य नागरिकांना आणि ज्येष्ठांना किती कार्यकाळावर किती टक्के व्याजदर दिले जाईल याबद्दल माहित करून घेऊ. 7 ते 45 दिवसांच्या कार्यकाळासाठी सामान्य नागरिकांना 3.50% तर ज्येष्ठांना 4.00% व्याजदर प्रदान केले जाते. 180 ते 210 दिवसांच्या कालावधीसाठी सामान्यांना 6.25% तर ज्येष्ठांना 6.75% व्याजदर दिले जाते. त्याचबरोबर 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 6.50% सर्वसामान्यांना आणि ज्येष्ठांना 7.50% व्याजदर दिले जाते.

महत्त्वाचं :
एफबीआयच्या अमृत कलश योजनेप्रमाणे आणखीन एका योजनेत ज्येष्ठांना लाभ मिळणार आहे. ही योजना 444 दिवसांची असून सामान्यांना 7.25% तर, ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर दिले जाणार आहे. या एफडीमध्ये तुम्ही 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Special FD 05 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SBI Special FD(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x