22 November 2024 6:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

SBI Special FD | SBI बँकेची ज्येष्ठांसाठी अत्यंत फायद्याची FD योजना, दरमहा मिळतील 6,333 रुपये, फायदाच फायदा - Marathi News

Highlights:

  • SBI Special FD
  • ज्येष्ठांना मिळतोय बंपर लाभ :
  • अनेक दिवसांपासून वाढत आहे योजनेची मुदत :
  • पाहून घ्या कॅल्क्युलेशन :
  • महत्त्वाचं :
SBI Special FD

SBI Special FD | सुरक्षित आणि चांगले व्याजदर मिळवून देणाऱ्या अनेक एफडी योजना उपलब्ध आहेत आणि त्या लोकप्रिय देखील आहेत. बरेच ज्येष्ठ नागरिक आपला पैसा सुरक्षित रहावा सोबतच आपल्याला गुंतवणुकीवर चांगले रिटर्न मिळावे या विचाराने एफडीमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे समजतात. आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या एका स्पेशल एफडी योजनेबद्दल सांगणार आहोत. ही एफडी योजना 400 दिवसांची असून तिचं नाव ‘एसबीआय अमृत कलश एफडी’ योजना असं आहे. सध्या या योजनेचे हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्याइतकेच दिवस अशी शिल्लक राहिले आहेत.

ज्येष्ठांना मिळतोय बंपर लाभ :

ही योजना ज्येष्ठांसाठी अतिशय खास योजना आहे. कारण की यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्तीचे व्याजदर निश्चित करण्यात आले आहे. म्हणजेच सामान्य ग्राहकांना 7.10% व्याजदर मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अधिक म्हणजेच 7.60% व्याजदर मिळते.

अनेक दिवसांपासून वाढत आहे योजनेची मुदत :

ही योजना एसबीआयने लॉन्च केल्याबरोबर अनेकांनी यामध्ये पैसे गुंतवणे सुरू केले. 400 दिवसांच्या या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी अनेकांनी पसंती दर्शवली. ग्राहकांच्या आवडीनुसार या योजनेचा कार्यकाळ वाढवावा लागला. सर्वप्रथम 12 एप्रिल 2023 मध्ये योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर योजना बंद करण्याची 23 जून 2023 ही तारीख निश्चित करण्यात आली. परंतु पुन्हा एकदा ही तारीख 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आणि आता परत एकदा 31 डिसेंबर 2024 पर्यंत योजनेची तारीख वाढवण्यात आली आहे. एसबीआयच्या या विशेष योजनेचे फक्त 6 दिवस बाकी आहेत.

पाहून घ्या कॅल्क्युलेशन :

समजा एखाद्या सामान्य व्यक्तीने एसबीआय अमृत कलश या योजनेमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याला वार्षिक व्याजाच्या हिशोबाने 7,100 रुपये मिळतील. या हिशोबाने जेष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर दिले जाते याचा अर्थ ज्येष्ठांना वार्षिक व्याजदरानुसार 7,600 रुपये मिळतील. योजनेचा कार्यकाळ लक्षात घेता तुम्हाला या योजनेमध्ये 400 दिवस गुंतवणूक करावी लागेल. एसबीआयच्या या स्पेशल योजनेत तुम्ही तब्बल 2 कोटींपर्यंत देखील पैसे गुंतवू शकता. उदाहरणार्थ एखाद्या सामान्य व्यक्तीने अमृत कलश या योजनेत 10 लाख रुपये गुंतवले असतील तर, त्याला वार्षिक व्याजदरानुसार 71,000 रुपये मिळतील. म्हणजेच प्रत्येक महिन्याला हातामध्ये 5,916 रुपये येतील. तर, या हिशोबाने ज्येष्ठ नागरिकांना 6,333 रुपये दरमहा मिळतील.

महत्त्वाचं :

एसबीआयच्या अमृत कलश योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना तिमाही आणि सहामाही दिवसांच्या आधारावर व्याजदर मिळू शकते. या विशेष फिक्स डिपॉझिट एफडीवर टीडीएस आणि मॅच्युरिटी व्याज कापून ग्राहकाच्या खात्यात जमा केली जाईल. विशेष म्हणजे या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एसबीआयचे योनो बँकिंग अँप वापरू शकता.

Latest Marathi News | SBI Special FD 26 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SBI Special FD(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x