16 April 2025 5:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL
x

SBI Special FD | SBI ग्राहकांसाठी खुशखबर, खास बँक FD वर मिळतोय मोठा व्याजदर, पैशाने पैसा वाढवा

SBI Special FD

SBI Special FD | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती भविष्याकरिता काही ना काही तडजोड काम असतानाच करून ठेवतो. फक्त भविष्यासाठीच नाही तर, जीवन जगत असताना येणाऱ्या अडचणींसाठी देखील व्यक्ती वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे सुरू करतो. अशातच तुम्ही आत्तापर्यंत अनेक सरकारी योजनांबद्दल ऐकलं असेल. बऱ्याच सरकारी योजनांमध्ये जास्त दिवसांचा मॅच्युरिटी पिरेड असतो.

सोबतच वेळेआधी पैसे काढण्यासाठी खूपसारे रुल देखील फॉलो करावे लागतात. त्यामुळे डोक्याला झंझट नसणारी आणि कमी दिवसांमध्ये चांगला परतावा देणारी एसबीआयची ही स्कीम तुम्हाला माहित आहे का? ही स्कीम तुम्हाला फक्त 444 दिवसांमध्येच योग्य व्याजदरासह सांगली रक्कम मिळवून देते.

नेमकी कोणती आहे योजना?
एसबीआयने नुकतीच आपल्या ग्राहकांसाठी ‘अमृतवृष्टी’ नावाची एक जबरदस्त योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे या योजनेत तुम्हाला फक्त 444 दिवसांचा मॅच्युरिटी पिरेड देण्यात आला आहे.

किती गुंतवणुकीवर किती टक्के % व्याज?
सर्वसामान्य व्यक्ती ‘अमृतवृष्टी’ या योजनेमध्ये 444 दिवसांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. 444 दिवसांचा मॅच्युरिटी टाईम संपल्यानंतर 7.25% व्याजदरानुसार तुम्हाला एक चांगली रक्कम परत मिळेल.

ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर:
या योजनेमध्ये सारख्या दिवसाच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर दिले जात आहे. म्हणजेच ज्येष्ठांना 5 लाखांच्या गुंतवणुकीवर एक वरून 5,47,524.59 एवढे रुपये मिळतील. तर, सर्वसामान्यांना 7.25% व्याजदराने 5,44,435.51 रुपये परत मिळतील. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा सर्वसामान्यांपेक्षा जास्त लाभ घेता येणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार आणि सोयीनुसार गुंतवणुकीचे पर्याय एसबीआयने ठेवले आहेत. अशातच अशा प्रकारच्या काही शॉर्ट टर्म योजना देखील आहेत. तुम्हाला या सर्व योजनांची माहिती पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर मिळून जाईल.

News Title : SBI Special FD Scheme Interest Rates check details 05 September 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SBI Special FD(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या