Senco Gold IPO | कमाईची सुवर्ण संधी! सेन्को गोल्ड IPO लाँच होतोय, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, IPO तपशील जाणून घ्या

Senco Gold IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मालामाल होऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सेन्को गोल्ड या कंपनीचा IPO 4 जुलै 2023 पासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सैन्को गोल्ड कंपनीचा IPO 6 जुलै 2023 पर्यंत गुंतवणूकीसाठी खुला असेल. अँकर गुंतवणूकदारांना 3 जुलै रोजी शेअर्सचे वाटप केले जाईल. (Senco Gold Share Price)
या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 301-317 रुपये निश्चित केली आहे. IPO इश्यूमधून सेन्को गोल्ड कंपनी 405 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहे. IPO नंतर सेन्को गोल्ड कंपनीचे बाजार भांडवल 2,460 कोटी रुपये होईल. सेन्को गोल्ड कंपनीच्या 405 कोटी रुपयेच्या IPO मध्ये 270 कोटीचे फ्रेश शेअर्स असतील.
सेन्को गोल्ड कंपनीच्या प्रवर्तकांपैकी एक असलेले SAIF Partners India IV Ltd चे प्रवर्तक SAIF Partners India IV Ltd IPO मध्ये 135 कोटी रुपयेचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहेत. IPO शेअरपैकी 50 टक्के राखीव वाटा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी असेल. 15 टक्के वाटा गैर संस्थेसाठी राखीव असेल. आणि 35 टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल.
सेन्को गोल्ड कंपनीने सांगितले की, कंपनी बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे IPO मध्ये जारी केल्या जाणाऱ्या इक्विटी शेअर्सच्या बाजारातील मागणीच्या मूल्यांकनाच्या आधारे बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून किंमत बँड, फ्लोअर किंमत आणि ऑफर किंमत निश्चित करणार आहे.
सेन्को गोल्ड ही कंपनी पूर्व भारतात सर्वात मोठी संघटित ज्वेलरी रिटेल कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. सेन्को गोल्ड कंपनी प्रामुख्याने सोने, हिरे, प्लॅटिनम ज्वेलरी आणि चांदीसह इतर मौल्यवान आणि अर्धमौल्यवान खडे आणि धातूंच्या व्यापारात गुंतलेली आहे.
सेन्को गोल्ड कंपनी आपली उत्पादने सेनको गोल्ड अँड डायमंड्स या नावाने शोरूम आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकते. सेन्को गोल्ड कंपनीचे प्रवर्तकांमध्ये सुवणकर सेन, जय हनुमान श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, आणि आए गण गणपतये, बजरंगबली ट्रस्ट सामील आहेत. IPO मधून जमा होणारे भांडवल सेन्को गोल्ड कंपनीच्या खेळल्या भांडवलाच्या गरजा आणि इतर सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी खर्च केले जाणार आहे.
मार्च 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षात सेन्को गोल्ड कंपनीने 4,108 कोटी रुपये कमाई केली होती. यात कंपनीने 158 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. 11 जुलै 2023 रोजी सेन्को गोल्ड कंपनीचे IPO शेअर्स वाटप केले जातील. आणि 14 जुलै 2023 रोजी स्टॉक शारे बाजारात सूचीबद्ध केला जाईल. IIFL सिक्युरिटीज, अम्बिट आणि Sol कॅपिटल मार्केट्स या सेन्को गोल्ड IPO इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. तर केफिन टेक्नॉलॉजीला IPO चे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Senco Gold IPO is ready to launch check details on 30 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER