4 December 2024 12:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

Senior Citizen Saving Scheme | या बँकांकडून ज्येष्ठांना मिळते 3 वर्षांच्या FD वर सर्वोत्तम व्याज, कोणत्या बँका चांगले व्याजदर देतात पाहूया

Senior Citizen Saving Scheme

Senior Citizen Saving Scheme | बऱ्याच योजनांमध्ये बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांतर्फे केल्या जाणाऱ्या एफडीत चांगले व्याजदर प्रदान केले जाते. त्याचबरोबर अशा अनेक योजना आहेत ज्यांमध्ये सर्वसामान्यांपेक्षा ज्येष्ठांना अधिक सवलती आणि जास्त व्याजदराचे फायदे अनुभवायला मिळतात.

FD च्या माध्यमातून ज्येष्ठांना आपात्कालीन गोष्टींसाठी पैसे जमा करून ठेवण्यास मदत मिळते. ज्यामुळे गरजेवेळी इतर व्यक्तींकडे हात पसरण्यापेक्षा स्वतःचेच पैसे वापरता येतात. एफडी तुमच्यासाठी फायद्याची ठरते कारण की, तुम्ही एफडीमध्ये पैसे गुंतवून तुम्हाला हवं तेव्हा बंद देखील करू शकता. दरम्यान एफडीवर मिळणारे व्याज हे करप्राप्तीचे व्याज असते. अनेक बँकांमध्ये सध्याच्या घडीला ज्येष्ठांना 7.75 टक्क्यांनी व्याजदर प्रदान केले जात आहे. दरम्यान आणखीन कोण कोणत्या बँका 1 लाखांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त व्याजदर देत आहेत पाहून घेऊ.

1) बँक ऑफ बडोदा :
बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये ज्येष्ठांसाठी 3 वर्षांच्या एफडीवर 7.75% ने व्याजदर दिले जाते. यामध्ये 3 वर्षांकरिता गुंतवलेले 1 लाख रुपये 1.26 लाख रुपये होतील.

2) एचडीएफसी, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक :
या तिन्ही बँकेत ज्येष्ठ नागरिकांकरिता तीन वर्षांच्या एफडीवर 7.50 टक्क्यांनी व्याजदर दिले जाते. म्हणजेच तीन वर्षांसाठी गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम 1.25 लाखांपर्यंत वाढेल.

3) ॲक्सिस बँक :
ॲक्सिस बँकेत ज्येष्ठांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर 7.60% व्याजदर मिळते. म्हणजेच तीन वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये व्याजदराने 1.25 लाख रुपये होतील.

4) कॅनरा बँक :
कॅनरा बँकेने ज्येष्ठांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर 7.30% व्याजदर ठेवले आहे. 3 वर्षांकरिता गुंतवलेले 1 लाख रुपये ती रक्कम 1.24 लाख रुपये होईल.

5) बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया :
या दोन्ही बँकेने जेष्ठ नागरिकांसाठी केल्या जाणाऱ्या एफडीवर 7.25 टक्क्यांने व्याजदर ठेवले आहे. ज्यामुळे 1 लाख रुपयांचे 1.24 लाख रुपये होतील.

6) इंडियन बँक :
इंडियन बँकेने ज्येष्ठांच्या तीन वर्षांच्या एफडीवर 6.75% व्याजदर ठेवले आहे. याचाच अर्थ तुम्ही तीन वर्षांसाठी गुंतवलेल्या 1 लाख रुपयांचे 1.22 लाख परत मिळतील.

7) युनियन बँक ऑफ इंडिया :
ज्येष्ठांसाठी 3 वर्षांच्या एफडीवर 7% ने व्याजदर दिले जात आहे. यामध्ये 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.23 लाख रुपये परतावा मिळेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Senior Citizen Saving Scheme 24 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Senior Citizen Saving Scheme(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x