Servotec Power Share Price | चॉकलेट किंमतीच्या 2 रुपयाच्या शेअरने 2 वर्षात आयुष्य बदललं, 1 लाखावर दिला 36 लाख रुपये परतावा
Servotec Power Share Price | सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 नोव्हेंबर 2021 रोजी 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 3500 टक्के मजबूत झाला आहे. मागील काही दिवसांत सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षेत्रात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे.
जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 36 लाख रुपये झाले असते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी सर्व्होटेक पॉवर स्टॉक 1.80 टक्के वाढीसह 73.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 100 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 12 रुपये होती. सर्व्होटेक पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1530 कोटी रुपये आहे.
सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीने नुकताच उत्तर प्रदेश सरकारसोबत EV चार्जर उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी 300 कोटी रुपये मूल्याचा गुंतवणूक करार संपन्न केला आहे. सर्व्होटेक पॉवर सिस्टीम्स कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 20 पैसे लाभांश वाटप केला होता. सर्व्होटेक पॉवर कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपये आहे.
उत्तर प्रदेश राज्य सरकारने घोषित केलेल्या इलेक्ट्रिक व्हेईकल मॅन्युफॅक्चरिंग अँड मोबिलिटी पॉलिसी 2022 अंतर्गत, सर्वोटेक पॉवर सिस्टीम कंपनी हा ईव्ही चार्जर उत्पादन प्रकल्प निर्माण करणार आहे. या वर्षी जुलै 2023 मध्ये, सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीने माहिती दिली होती की, कंपनी आपले शेअर्स विभाजित करणार. यासाठी कंपनीने स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख म्हणून l 28 जुलै 2023 हा दिवस निश्चित केला होता. सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य स्टॉक स्प्लिटनंतर 1 रुपये झाले आहे.
सर्व्होटेक पॉवर सिस्टीम कंपनीचे शेअर्स जुलै 2023 मध्ये 12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर या कंपनीचे शेअर्स 165 रुपये किमतीवर पोहोचले होते. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 1250 टक्के नफा कमावला होता. सर्व्होटेक पॉवर सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सनी अल्प आणि दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट कमाई करून दिली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Servotec Power Share Price NSE 12 October 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल