21 January 2025 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीबाबत अपडेट, 40 रुपयाचा शेअर मालामाल करणार- NSE: RPOWER Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स
x

Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर शेअरला या किमतीवर मजबूत सपोर्ट, अल्पावधीत मिळेल मोठा परतावा

Servotech Share Price

Servotech Share Price | सर्व्होटेक पॉवर सिस्टम या इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सोल्यूशन सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच हिंदुस्तान पेट्रोलियम लिमिटेड कंपनीने सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीला 102 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. यासह इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने देखील सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीला 111 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 90.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनी अंश )

शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटसह 95.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. 6 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीचे शेअर्स 108.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील वर्षी 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 16.48 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

प्रभुदास लीलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीच्या शेअर्समध्ये 88 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर या स्टॉकमध्ये 100 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 100 रुपये किमतीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 112 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीने नुकताच ईव्ही चार्जरच्या पुरवठ्यासाठी अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी टोटल एनर्जीज ई-मोबिलिटी कंपनीशी करार केला आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोटेक पॉवर सिस्टीम कंपनी विविध विमानतळांवर बसवण्यात येणारे EV चार्जरचे उत्पादन, पुरवठा आणि स्थापनेचे काम करेल. मागील महिन्यातच सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीला BPCL कंपनीने 1800 DC फास्ट ईव्ही चार्जर बसवण्यासाठी 120 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Servotech Share Price NSE Live 04 March 2024.

हॅशटॅग्स

Servotech Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x