21 November 2024 3:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News
x

Servotech Share Price | संधी सोडू नका! स्वस्त शेअर मालामाल करतोय, अवघ्या 3 वर्षांत दिला 5564% परतावा

Servotech Share Price

Servotech Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स आज 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.4 टक्क्यांच्या वाढीसह 98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्सने 100 रुपयेचा टप्पा ओलांडला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 108.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 69.50 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,135 कोटी रुपये आहे. ( सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनी अंश )

आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी सर्वोटेक पॉवर सिस्टम्स स्टॉक 10.00 टक्के वाढीसह 107.29 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5564 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 1.73 रुपयेवरून वाढून 98 रुपये किमतीवर पोहचली होती.

मागील एका महिन्यात सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढले आहेत. तर 2024 या वर्षात कंपनीचे शेअर्स 25 टक्के वाढले आहेत. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3,726.98 टक्के परतावा कमावून दिला आहे. सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः EV चार्जिंग आणि सौर ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करते.

नुकताच या कंपनीने दिल्लीतील पहिले असे ग्रिड-कनेक्टेड सौर उर्जेवर चालणारे ईव्ही चार्जिंग कारपोर्ट लॉन्च करण्यासाठी नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडिया कंपनीसोबत भागीदारी केल्याची माहिती दिली आहे. या कंपनीला इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात व्यवसाय करण्याचा 20 वर्षाचा अनुभव आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी अत्याधुनिक एसी आणि डीसी चार्जिंग सोल्यूशन्स डिझाइन करण्याचे काम करते. या कंपनीने तयार केले चार्जर व्यावसायिक आणि घरगुती अशा दोन्ही मागणीची पूर्तता करतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Servotech Share Price NSE Live 12 July 2024.

हॅशटॅग्स

Servotech Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x