27 January 2025 10:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Sharda Cropchem Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 400% परतावा देणारा मल्टिबॅगेर शेअर खरेदी करण्याचा तज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा

Sharda Cropchem Share Price

Sharda Cropchem Share Price | ‘शारदा क्रॉपकेम’ कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. विशेषत: पोस्ट-कोविड रिबाउंडमध्ये या स्टॉकने लोकांना मालामाल केले आहे. एप्रिल 2020 पासून ते आजपर्यंत, या केमिकल कंपनीच्या शेअरची किंमत 105 रुपयेवरून 520 रुपयेवर पोहचली आहे. या दरम्यानच्या काळात गुंतवणूकदारांनी 400 टक्के परतावा कमावला आहे. नुकताच आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचा अंदाज वर्तवला आहे. आनंद राठी फर्मच्या अहवालानुसार, ‘शारदा क्रॉपकेम’ कंपनीचे शेअर पुढील 2-3 महिन्यात 620 रुपये पर्यंत वाढू शकतात. सध्या गुंतवणूक करणारे लोक पुढील काळात यातून 20 टक्के परतावा कमवू शकतात. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के घसरणीसह 481.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sharda Cropchem Share Price | Sharda Cropchem Stock Price | BSE 538666 | NSE SHARDACROP)

आनंद राठी फर्मने या केमिकल कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केले आहेत. त्यांनी आपल्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, “शारदा क्रॉपकेम कंपनीच्या शेअरवर मागील काही काळापासून दबाव पाहायला मिळत आहे, मात्र शेअर मजबूत सपोर्ट लेवल जवळ ट्रेड करत आहे. पूर्वीही स्टॉकने या किंमत पातळीपासून सुधारणा दर्शवली होती. दैनंदिन चार्ट पॅटर्नवर स्टॉकने 500 रुपये ते 510 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट बनवला आहे. त्यामुळे आनंद राठी फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, इथून हा स्टॉक वरच्या दिशेने वाढू शकतो.

शारदा क्रॉपकेमच्या शेअर्सची किमत वाढ :
ब्रोकरेज फर्म दिलेल्या माहितीनुसार, “शारदा क्रॉपकेम कंपनी मुख्यतः कृषी रसायने, तांत्रिक ग्रेड आणि फॉर्म्युलेशन, कन्व्हेयर बेल्ट, रबर बेल्ट/शीट्स, रंग आणि डाई इंटरमीडिएट्स यांसारख्या बिगर कृषी उत्पादनांच्या निर्यात व्यवसायात काम करते. जगभरातील विविध देशांमध्ये कंपनीने आपल्या उत्पादन श्रेणीचा विस्तार केला आहे. आणि कंपनी नवीन बाजारपेठांमध्ये आपला उद्योग विस्तार करण्याच्या संधी शोधत आहेत.

आनंद राठी फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ” उच्च नफा वाढीवर लक्ष, उच्च मार्जिन, उत्पादनांचे वाढते प्रमाण, सखोल प्रवेश या सर्व घटकांचा विचार करता आम्ही कंपनीच्या भविष्यातील कामगिरीबाबत उत्साही आहोत. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे लोक शारदा क्रॉपकेम कंपनीच्या शेअरवर 465 रुपये स्टॉप लॉस लावून गुंतवणूक करू शकतात”.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sharda Cropchem Share Price 538666 SHARDACROP stock market live on 03 February 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(460)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x