18 November 2024 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

Share India Share Price | तब्बल 1700 टक्के परतावा देणारा शेअर अल्पावधीत 30 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा देईल

Share India Share Price

Share India Share Price | शेअर इंडिया सिक्युरिटीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत मजबूत नफा मिळवून दिला आहे. शेअर इंडिया सिक्युरिटीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते.

आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. शेअर इंडिया सिक्युरिटीज या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6080 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1880 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 990 रुपये होती.

मागील 1 महिन्यात शेअर इंडिया सिक्युरिटीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 11 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 48 टक्के मजबूत झाली आहे. आज मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी शेअर इंडिया सिक्युरिटीज स्टॉक 0.68 टक्के घसरणीसह 1,812 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअर इंडिया सिक्युरिटीज कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्के नफा कमावून दिला आहे. 25 सप्टेंबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 103 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांक किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 1700 टक्के मजबूत झाला आहे.

प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी शेअर इंडिया सिक्युरिटीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 2400 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. शेअर इंडिया सिक्युरिटीज ही कंपनी मुख्यतः वित्तीय सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

ही कंपनी आपल्या ग्राहकांना तंत्रज्ञानाचा वापर करून भांडवली बाजारातील सर्वोत्तम सेवा प्रदान करते. या कंपनीची स्थापना 1994 साली झाली होती. टेक आधारित वित्तीय सेवां प्रदान करणाऱ्या कंपन्यांच्या स्पर्धेत शेअर इंडिया सिक्युरिटीज ही कंपनी भारतात अग्रगण्य मानली जाते.

शेअर इंडिया सिक्युरिटी कंपनीने सिल्व्हर लीफ कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील 100 टक्के भाग भांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या अधिग्रहणामुळे शेअर इंडिया सिक्युरिटीज कंपनीच्या कामकाजात आणि महसूलात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

सिल्व्हर लीफ कंपनीने मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टेक्नॉलॉजी आणि मॅथेमॅटिकल मॉडेलिंगद्वारे कमी लेटन्सी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर ट्रेडिंगच्या विविध कल्पना शोधल्या आहेत. मागील एका आर्थिक वर्षात सिल्व्हर लीफ कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीची आर्थिक उलाढाल जवळपास 16.33 कोटी रुपयेची होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Share India Share Price NSE Live 02 January 2024.

हॅशटॅग्स

Share India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x