17 April 2025 10:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

Shares Buying Selling T+1 | शेअर बाजारातील ट्रेडिंगचे नियम बदलणार, सेबी लवकरच नवीन प्रणाली लागू करण्याच्या तयारीत, डिटेल वाचा

Shares Buying Selling T+1

Shares Buying Selling T+1 | स्टॉक मार्केट ट्रेडिंग अधिक सोपी होणार आहे. 27 जानेवारी 2023 पासून भारतीय शेअर बाजारात डील सेटलमेंटसाठी T + 1 प्रणाली लागू केली जाणार आहे. यामुळे शेअर्समध्ये होणारी खरेदी-विक्रीची सेटलमेंट डील लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 तासांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात T + 3 प्रणाली कार्यरत आहे. त्यामुळे व्यवहार प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 3 दिवस लागतात. सुरुवातीला लार्ज कॅप आणि ब्लू चिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये T+1 ही प्रणाली लागू होईल, म्हणजेच चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना याचा लाभ आधी मिळेल आणि त्यानंतर हळूहळू सर्वांसाठी या प्रणालीची अंमलबजावणी केली जाईल. T+1 प्रणालीने लहान गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे अधिक आकर्षित होतील. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, T+1 व्यवस्थेमुळे FPI द्वारे टॉप कंपनीच्या शेअरचे ट्रेडिंग व्होल्युम प्रभावित केले जाण्याची शक्यता आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Share Price | Stock Price | BSE | NSE | Shares Buying Selling T+1)

T+1 प्रणालीचे नुकसान
T+1 या प्रकरणाचा मागोवा घेणाऱ्या अनेक लोकांचे म्हणणे आहे की, T+1 प्रणाली लागू झाली तर FPIs द्वारे शेअर बाजारातील व्यवहारांची संख्या प्रभावित केली जाऊ शकते. जेव्हा जेव्हा FPI ज्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवतात, त्या क्षेत्राच्या मार्केट डायनॅमिक्समध्ये जबरदस्त उलाढाल होते. जर FPI नी व्यवहार थांबवले किंवा व्यवहारांची संख्या मर्यादित केली तर स्टॉक व्हॉल्यूममध्ये घट होऊ शकते.

T+1 म्हणजे नक्की काय ?
सध्या भारतीय स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स खरेदी-विक्री करताना व्यवहाराच्या दिवस सोडला तर शेअर्स डिमॅट मध्ये क्रेडिट होण्यास किंवा विकलेल्या शेअरचे पैसे गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा होण्यास दोन दिवस कालावधी लागतो, यालाच T+2 असे म्हणतात. अशा प्रकारे हे व्यवहार पूर्ण होण्यासाठी तीन दिवस लागतात. आता T+1 या प्रणालीनुसार हा व्यवहार पूर्ण कराराच्या दुसऱ्याच दिवशी पूर्ण होईल.

T + 1 प्रणालीचा फायदा
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, T+1 या प्रणालीचा फायदा किरकोळ गुंतवणूकदारांना अधिक होईल. असे गुंतवणुकदार जे छोट्या रकमेत ट्रेडिंग करतात त्यांना या नवीन प्रणालीचा फायदा अधिक होईल. समजा खरेदी विक्री करार एका दिवसात पूर्ण झाला तर दुसऱ्या दिवशी तुमच्या खात्यात पूर्ण पैसे किंवा खरेदी केलेले शेअर्स जमा होतील. असे झाल्यास तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी नवीन शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकता. याशिवाय तुमचे भांडवल जास्त काळ अडकून राहणार नाही, आणि त्याचा वापर तुम्हाला लगेच करता येईल. अशा स्थितीत तुम्ही सध्याच्या व्यवस्थेपेक्षा अधिक ट्रेडिंग करु शकता.

20 वर्षांनंतर नियमात बदल
यापूर्वी 1 एप्रिल 2003 रोजी सेबीने शेअर बाजारात T+3 वरून T+2 ही नवीन प्रणाली लागू केली होती. आता सेबी T+2 वरून T+1 प्रणाली लागू करत आहे. या नवीन प्रणालीने भारत जगातील T+1 प्रणाली लागू असलेल्या निवडक बाजारपेठांमध्ये सामील होईल. सध्या जगातील बहुतांश देशांच्या शेअर बाजारात अजूनही T+2 प्रणाली कार्यरत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shares Buying Selling T+1 SEBI implement in Stock market trading check details on 21 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Shares Buying Selling T+1(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या