26 April 2025 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर पुन्हा मालामाल करणार, यापूर्वी 464% परतावा दिला - NSE: NTPC
x

Shelter Pharma IPO | आला रे आला IPO आला! शेल्टर फार्मा कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, शेअरची प्राईस बँड फक्त 42 रुपये

Shelter Pharma IPO

Shelter Pharma IPO | शेल्टर फार्मा या फार्मा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचा IPO गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी ओपन करण्यात आला आहे. तुम्ही या IPO मध्ये 14 ऑगस्ट 2023 पर्यंत पैसे लावू शकता. शेल्टर फार्मा ही कंपनी मुख्यतः हर्बल उत्पादने बनवणाचे काम करते. या कंपनीचा IPO खुला झाला तेव्हा आधीच TVS सप्लाय चेन सोल्युशन्स कंपनीचा IPO देखील खुला होता. आता गुंतवणुकदारांना दोन्ही कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.

IPO किंमत बँड :

शेल्टर फार्मा कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 42 रुपये निश्चित केली होती. कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 3000 शेअर्स वाटप केले होते. या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 1,26,000 रुपये जमा करावे लागतील. IPO द्वारे शेल्टर फार्मा कंपनी 16.03 कोटी रुपये खुल्या बाजारातून जमा करणार आहे.

या कंपनीचा IPO 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. 18 ऑगस्ट रोजी कंपनी गुंतवणुकदारांना शेअर्स वाटप करेल. आणि 22 ऑगस्ट 2023 पर्यंत स्टॉक गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा होतील. शेल्टर फार्मा कंपनीचे शेअर्स 23 ऑगस्ट 2023 रोजी सूचीबद्ध होऊ शकतात.

शेल्टर फार्मा स्टॉक जीएमपी :

शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, शेल्टर फार्मा कंपनीचा आयपीओ स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 6 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. पुढील काही दिवसांत ग्रे मार्केट हा स्टॉक आणखी वाढू शकतो. गुंतवणुकदार देखील IPO ला मिळणारा प्रतिसाद पाहून गुंतवणूक करत असतात. जीएमपी किंमत ही एक अंदाजित किंमत असते. शेअर बाजारातील कोणत्याही अधिकृत ब्रोक्ररशिवाय जे सौदे बाजारच्या बाहेर होतात, त्याला ग्रे मार्केट ट्रेडिंग म्हणतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shelter Pharma IPO is open for investment on 11 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Shelter Pharma IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony