26 April 2025 1:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल PPF Investment | 90% लोकांना माहित नाही, मॅच्युरिटीनंतरही दर वर्षी 700000 रुपये व्याज मिळतं, पैसे बचतीचीही गरज नसते EPF for Home Loan | पगारदारांनो, गृहकर्ज डोईजड झालंय? EPF च्या माध्यमातून कर्जमुक्त होऊ शकता, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 26 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या BHEL Share Price | पीएसयू शेअर 4.21 टक्क्यांनी घसरला, बाजारातील पडझडीत तज्ज्ञांनी दिला असा सल्ला - NSE: BHEL Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 26 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK
x

Shriram Pistons Share Price | मल्टिबॅगर श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्ज शेअरमध्ये तेजी, आता गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घेणार

Shriram Pistons Share Price

Shriram Pistons Share Price | शेअर बाजारात असे अनेक कंपन्या आहेत, जे आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करतात. आणि भरघोस परतावा देखील कमावून देतात. असाच एक स्टॉक तज्ज्ञांच्या नजरेत पडला आहे. या स्टॉकचे नाव आहे, श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्ज लिमिटेड. या कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Shriram Share Price)

श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्ज कंपनीने गुंतवणुकदारांना एक शेअरवर 1 बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्ज कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 2075 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

स्टॉक परफॉर्मन्स :

13 जून 2023 रोजी श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्ज कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. बैठकीनंतर कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनी आपल्या शेअरधारकांना प्रत्येक 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. मात्र या बोनस शेअरची रेकॉर्ड डेट कंपनीने अद्याप निश्चित केली नाही. श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्ज लिमिटेड कंपनीने जून महिन्यात एक्स डिव्हिडंडवर ट्रेड केला होता. मागील 1 वर्षात श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्ज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 203 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारी श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्ज कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या घसरणीसह 1890.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40.96 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 2023 मध्ये श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्ज कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 75 टक्के पेक्षा जास्त वाढले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 203 टक्के परतावा दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shriram Pistons Share Price today on 04 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Shriram Pistons Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या