25 April 2025 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरने लोअर सर्किट हिट केला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर 4.05 टक्क्यांनी घसरला, आता महत्वाची अपडेट आली - NSE: NTPCGREEN IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATATECH Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये घसरगुंडी, यापूर्वी दिला 726% परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RTNPOWER Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल
x

SJ Logistics IPO | होय! 125 रुपयांचा IPO शेअर पहिल्याच दिवशी देईल 64 टक्के परतावा, तपशील जाणून घ्या

SJ Logistics IPO

SJ Logistics IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही एसजे लॉजिस्टिक्स कंपनीच्या IPO वर पैसे लावू शकता. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, एसजे लॉजिस्टिक्स कंपनीचा IPO स्टॉक 80 रुपये किमतीच्या वर ट्रेड करत आहे. एसजे लॉजिस्टिक्स कंपनीचा IPO 12 डिसेंबर 2023 ते 14 डिसेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.

एसजे लॉजिस्टिक्स कंपनीने सेबीकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार IPO ची किंमत बँड 121 रुपये ते 125 रुपये निश्चित करण्यात आली आहे. कंपनीनेएका लॉटमध्ये 1000 शेअर्स ठेवले आहेत. एसजे लॉजिस्टिक्स कंपनीचा एक IPO लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान 125,000 रुपये जमा करावे लागतील. sHNIs किमान दोन लॉट आणि bHNIs किमान 8 लॉटमध्ये गुंतवणूक करू शकतात.

एसजे लॉजिस्टिक्स कंपनीच्या IPO चा आकार 48 कोटी रुपये आहे. ही कंपनी आपल्या IPO अंतर्गत 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले फ्रेश शेअर्स वाटप करणार आहे. एसजे लॉजिस्टिक्स कंपनीने आपल्या IPO अंतर्गत 35 टक्के कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. एसजे लॉजिस्टिक्स कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 67.55 टक्के भाग भांडवल धारण केले आहे, जे IPO लिस्टिंगनंतर 49.64 टक्के पर्यंत कमी होईल.

एसजे लॉजिस्टिक्स कंपनीचा IPO 12 डिसेंबर ते 14 डिसेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. 15 डिसेंबर रोजी शेअर वाटपाचा आधार निश्चित केला जाईल. आणि ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स वाटप होणार नाही, त्यांचे पैसे 18 डिसेंबर 2023 रोजी परत केले जातील. 18 डिसेंबर रोजी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात कंपनी शेअर्स जमा करेल. आणि 19 डिसेंबर 2023 रोजी शेअर बाजारात एसजे लॉजिस्टिक्स कंपनीचा IPO स्टॉक सूचीबद्ध केला जाईल.

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, एसजे लॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर्स 80 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. 5 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 75 रुपये किमतीवर पोहोचले होते. शेअर किंमत बँड आणि GMP लक्षात घेता एसजे लॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर्स 205 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच गुंतवणुकदारांना पहिल्याच दिवशी 64 टक्के नफा मिळू शकतो.

एसजे लॉजिस्टिक्स ही कंपनी मुख्यतः लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी फ्रेट फॉरवर्डिंग, कस्टम क्लिअरन्स, वाहतूक आणि कार्गो प्रकल्प हाताळणी करण्याचे काम करते. यासह एसजे लॉजिस्टिक्स कंपनी गारमेंट, फार्मास्युटिकल, ऑटोमोबाईल, जड अभियांत्रिकी वस्तू, पॉवर ट्रान्समिशन, लोह आणि पोलाद उद्योगांना देखील आपल्या लॉजिस्टिक सेवा प्रदान करण्याचे काम करते. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एसजे लॉजिस्टिक्स कंपनीने महसूल संकलनात 29.88 टक्के वाढ नोंदवली होती. तर PAT मध्ये कंपनीने 340.23 टक्के वाढ नोंदवली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJ Logistics IPO GMP Today 09 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SJ Logistics IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या