22 February 2025 4:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा
x

SJVN Share Price | SJVN सहित हे दोन PSU शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राइस नोट करा

SJVN Share Price

SJVN Share Price | नुकताच भारत सरकारने वीज कंपन्यांना कोळसा आधारित वीज प्रकल्प उभारण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची खरेदी करण्याची सूचना दिली आहे. यासाठी भारतातील वीज कंपन्या 33 अब्ज रुपये गुंतवणूक करून नवीन उपकरणे खरेदी करू शकतात. नुकताच जॅक्सन ग्रीन कंपनीने बुधवारी माहिती दिली की, त्यांनी 400 मेगावॅट सौर उर्जेच्या खरेदीसाठी NHPC या सरकारी कंपनी सोबत करार केला आहे.

मागील महिन्यात ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत कोळशावर चालणाऱ्या नवीन प्लांटची उभारणी करण्यासाठी लागणारे टूल्स आणि उपकरणाच्या ऑर्डरिंगला गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. यांचा परिमाण एसजेव्हीएन आणि NHPC सारख्या वीज निर्मिती करणाऱ्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्सवर पाहायला मिळत आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेव्हीएन स्टॉक 4.35 टक्क्यांच्या वाढीसह 136.75 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीचे शेअर्स आज मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 0.59 टक्के वाढीसह 141.23 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सध्या भारताला कोळशावर चालणारे नवीन प्लांट वाढवण्याची आवश्यकता आहे. कारण सध्याच्या वीज निर्मिती क्षमतेसह देशाची उर्जेची मागणी पूर्ण करणे कठीण आहे. कोरोनानंतर भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आणि सर्वात वेगवान आर्थिक विकास दर असलेला देश म्हणून नावारूपाला आला आहे.

वाढत्या उष्णतेमुळे देशातील विजेच्या मागणीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. याचा फायदा एनएचपीसी आणि एसजेव्हीएन सारख्या वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना होऊ शकतो. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NHPC स्टॉक 2.51 टक्क्यांच्या वाढीसह 101.50 रुपये किमतीवर पोहचला होता. आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी NHPC स्टॉक 0.29 टक्के वाढीसह 103.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, एसजेव्हीएन स्टॉकने आपली 50 दिवसांची EMA पातळी ओलांडली आहे. हा स्टॉक RSI मध्ये मजबूत वाढीसह ट्रेंड रिव्हर्सलचे संकेत आहेत. तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत एसजेव्हीएन स्टॉक 167 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 128 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 05 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SJVN Share price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x