22 February 2025 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

SJVN Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 6 महिन्यांत 100 टक्के जास्त परतावा देणारा SJVN शेअर स्वस्त झाला, खरेदीची योग्य संधी

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन या सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. या सरकारी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के लोअर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 5.38 टक्के घसरणीसह 106.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

डिसेंबर 2023 तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 50 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेव्हीएन कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले, आणि शेअरमध्ये घसरण सुरू झाली.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 122.25 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मात्र नफा वसुलीमुळे शेअर 112.50 रुपये किमतीवर आले. एसजेव्हीएन या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 44,210.20 कोटी रुपये आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 51 टक्क्यांनी घसरून 138.97 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीने 287.42 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत एसजेव्हीएन या सरकारी कंपनीने 607.72 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 711.24 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. एसजेव्हीएन कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आपल्या पात्र शेअरधारकांना 1.15 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीपर्यंत एसजेव्हीएन कंपनीमध्ये भारत सरकारचा एकूण वाटा 81.85 टक्के होता. यापैकी केंद्र सरकारचा वाटा 55 टक्के असून हिमाचल प्रदेश सरकारचा वाटा 26.9 टक्के आहे. तर सार्वजनिक गुंतवणुकदारांचा वाटा 10.5 टक्के आहे.

मागील 6 महिन्यांत एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 248 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 13 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SJVN Share price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x