22 February 2025 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा
x

SJVN Share Price | SJVN स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, टार्गेट प्राईस नोट करा

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीने नुकताच आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर हा स्टॉक तेजीत आला होता. बुधवारी एसजेव्हीएन स्टॉक 9 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. जून 2023 तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीने 31 टक्के वाढीसह 357 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 271.75 कोटी रुपये नफा कमावला होता. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 55,508 कोटी रुपये आहे. जून तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीचे एकूण उत्पन्न 29 टक्के वाढीसह 958.47 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 744.39 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 0.17 टक्के वाढीसह 142.37 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सचा बीटा 1.8 आहे, जो एका वर्षात उच्च अस्थिरता दर्शवतो. या स्टॉकने 21 ऑगस्ट 2023 रोजी 55 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. आणि 5 फेब्रुवारी 2024 रोजी हा स्टॉक 170.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सचा RSI 43.4 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये व्यापार करत नाही.

एसजेव्हीएन स्टॉक आपल्या 5 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसांच्या SMA पेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. तर 20 दिवस, 30 दिवसांच्या SMA पेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 149.30 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 406 टक्के वाढली आहे. मागील वर्षी जून तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 362.60 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर या वर्षी जून तिमाहीत कंपनीचा खर्च 476.39 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, एसजेव्हीएन स्टॉकने 140 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तर या स्टॉकला 148 रुपये किमतीवर मजबूत रेझिस्टन्स मिळत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 155 रुपये किमतीवर जाऊ शकतो. सॅन्क्टम वेल्थ फर्मच्या तज्ञांच्या मते, जानेवारी 2024 पासून एसजेव्हीएन स्टॉक 158-128 रुपये या रेंजमध्ये व्यवहार करत आहे.

दीर्घकालीन गुंतवणूकदार 155 रुपये टार्गेट प्राइससाठी स्टॉक खरेदी करू शकतात. त्यानंतर हा स्टॉक 175 रुपये किमतीवर जाऊ शकतो. एसजेव्हीएन लिमिटेड ही सरकारी वीज निर्मिती करणारी कंपनी आहे. ही कंपनी जल विद्युत, पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा निर्मितीच्या व्यवसायात गुंतलेली आहे. या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये थर्मल पॉवर, हायड्रो पॉवर, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, पॉवर ट्रान्समिशन, सल्लागार आणि पॉवर ट्रेडिंग यांचा देखील समावेश होतो.

News Title | SJVN Share Price NSE Live 16 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SJVN Share price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x