15 January 2025 5:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

SJVN Share Price | SJVN शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक तेजीत परतावा देणार

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढले होते. एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीला 14,000 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला ईशान्य भारतातील राज्यामध्ये हे काम करायचे आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )

शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 156.75 रुपये किमतीवर ओपन झाले होते. यांनतर काही वेळात हा स्टॉक 13.23 टक्क्यांच्या वाढीसह 159.60 रुपये किमतीवर पोहचला होता. या एका दिवसात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी एसजेव्हीएन स्टॉकमधून जबरदस्त नफा कमाई केली आहे. शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 4.93 टक्के वाढीसह 148 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, मिझोरम सरकारने दरझो लुई पंप्ड स्टोरेज कंपनीचे काम त्यांना सोपवले आहे. या ऑर्डर अंतर्गत एसजेव्हीएन कंपनीला तुईवई नदीवर 2400 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारायचे आहे. या प्रकल्पाचे एकूण मूल्य 13,947.50 कोटी रुपये आहे. एसजेव्हीएन कंपनीला हे काम करण्यासाठी 72 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कराराशी संबंधित संपूर्ण प्रक्रिया पुढील 3 महिन्यांत पूर्ण केली जाईल.

एसजेव्हीएन कंपनीने IREDA कंपनीसोबत नेपाळमध्ये 900 MW क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचा कॉन्ट्रॅक्ट मिळवला आहे. 2024 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 67 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षभरात एसजेव्हीएन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 155 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

भारत सरकारची एसजेव्हीएन कंपनीतील भागीदारी 55 टक्के आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 11.83 टक्के भागभांडवल धारण केले आहे. एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 170.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 52.69 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 59,870.43 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 27 July 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x